भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या सात महिन्यांपूर्वी त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्ममध्ये होता. मात्र, आज तो भारतीय संघासाठी चांगले प्रदर्शन करत आहे आणि आयर्लंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी त्याला कर्णधार देखील बनवले गेले आहे. सध्या सुरू असेलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत हार्दिक संघाचा उपकर्णधार आहे. आयपीएल २०२२ मधील प्रदर्शाननंतर त्याने भारतीय संघात पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे.
भारतीय संघाचा कर्णधार बनण्याविषयी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) पहिल्यांदाच बोलला आहे. माध्यमांशी बोलताना हार्दिक म्हणाला की, “मला दक्षिण आफ्रिका मालिका सुरू होताच समजले होते की, ही जबाबदारी मला मिळणार आहे. खरोखर स्वतःच्या देशाचे नेतृत्व करणे सन्मानाची बाब आहे. कुणीच ७ महिन्यांपूर्वी असा विचार केला नसेल की, असे होईल. पण आयुष्य बदलत असते. जर तुमच्याकडे योग्य विचार असेल आणि कष्ट केले, तर या गोष्टी खूप काही बदलू शकतात.”
हार्दिकने मागच्या वर्षी टी-२० विश्वचषकातील खराब प्रदर्शनानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. त्याविषयी हार्दिक म्हणाला की, “जेव्हा मी क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती, तेव्हा मी निर्णय घेतला होता की, जेव्हा मी पुनरागमन करेल मी माझ्या सर्वोत्त रूपात असेल. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून देणे, मला भारतीय संघाचा उपकर्णधार बनवले जाणे, या गोष्टी फक्त प्रक्रियेचा एक भाग आहेत, जी मी भारतीय संघात पुन्हा येण्यासाठी पाळली आहे. मी निर्णय घेतला की, मला माझ्या जुन्या रूपात पुन्हा जायचे आहे, जे फिट होते. जे रूप फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण देखील करायचे. जेव्हा मी मागे वळून पाहतो की, मी सहा महिन्यांपूर्वी कसा होतो, आणि सहा महिन्यांनंतर कसा आहे, माझ्या आयुष्यात मी यापेक्षा मोठा यू-टर्न घेऊ शकत नाही.”
आयर्लंडविरुद्ध हार्दिक पहिल्यांदाच भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. “मी कधीच जबाबदारीवरून पळ काढला नाहीये. मी जबाबदारी घेतो. त्यामुळे मला योग्य निर्णय घेता येतात. परिस्थिती सांभाळता येते. मला माहिती आहे की, मी योग्य निर्णय घेईल, कारण मी त्याची पूर्ण जबाबदारी घेतो,” असे हार्दिक पुढे बोलताना म्हणाला.
दरम्यान, शुक्रवारी खेळल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात हार्दिकचे प्रदर्शन कौतुकात पात्र होते. त्याने ३१ चेंडूत ४६ धावा केल्या, ज्या भारताच्या विजयासाठी महत्वपूर्ण ठरल्या. भारताने हा सामन ८२ धावांच्या अंतराने जिंकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाला जबाबदार कोण? केशव महाराजने ‘यांच्या’वर फोडलं अपयशाचं खापर






