---Advertisement---

लॉक डाऊनमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ शिलेदाराने गुपचूप उडवला लग्नाचा बार?

On: सोमवार, जून 1, 2020 4:10 PM
---Advertisement---

मुंबई । भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतषबाजी क्रिकेट फॅन्सला पाहायला मिळाली नसली तरी यंदाच्या वर्षात त्याने क्रिकेट फॅन्सला अनेक सुखद धक्के दिले आहेत. 1 जानेवारी 2020 त्याने बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टेनकोव्हिक हिच्यासोबत साखरपुडा केला होता. नुकतेच त्याने या लॉकडाऊनमध्ये गुपचुपपणे लग्न उरकल्याचे वृत्त आहे.

हार्दिक पंड्याने सोशल मीडियावर लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. पंड्याने एक फोटो शेअर केला आहे. यात त्याने आपली पत्नी प्रग्नेंट असून लवकरच घरात एक नवा पाहुणा येणार असल्याचेही सांगितले. टीम इंडियाचा हा अष्टपैलू खेळाडू लवकरच बापमाणूस होणार असल्याने खूपच आनंदात आहे.

परंतु काही इंग्रजी माध्यमातील वृत्तांनुसार हार्दिकने लाॅकडाऊनमध्ये लग्नाचा बार उडवला आहे. तर काही माध्यमांनुसार त्याने अजून लग्न केलेले नाही. याबद्दल हार्दिकने मात्र कोणताही खुलासा केला नाही.

काल आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये तो म्हणाला की, आतापर्यंतच्या जीवनात नताशा आणि माझा प्रवास खूप सुखद झाला आहे. आता त्यापेक्षाही चांगला होणार आहे. आमच्या घरी लवकरच एक नवा पाहुणा येणार आहे. त्यामुळे आम्ही सारे जण उत्साहित आहोत. त्यासाठी आम्हाला तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद पाहिजे.

https://www.instagram.com/p/CA2khRLFsAz/

हार्दिक पंड्याने सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर केल्यानंतर फॅन्सकडून शुभेच्छाचा वर्षाव होऊ लागला. याच दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यासह काही क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या. कोहली शुभेच्छा देताना लिहिले की, आपल्या जीवनात तिसरा सदस्य येणार असल्याने तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---