---Advertisement---

मला आशा नव्हती की इतक्या लांबून हिट लागेल; ‘त्या’ रनआऊटबद्दल हार्दिक पंड्याचे भाष्य

On: रविवार, एप्रिल 18, 2021 4:07 PM
---Advertisement---

शनिवारी झालेल्या (१७ एप्रिल) सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमने सामने होते. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने सनरायझर्स हैदराबाद संघावर १३ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात हार्दिक पंड्याने आक्रमक फलंदाजी करत असलेल्या डेविड वॉर्नरला अप्रतिम क्षेत्ररक्षण करत धावबाद करून माघारी धाडले होते. यामुळे सामना मुंबई इंडियन्स संघाच्या दिशेने वळला होता. सामना झाल्यानंतर हार्दिक पंड्याने डेविड वॉर्नरला धावबाद केल्याबाबत भाष्य केले आहे.

मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १५० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. त्यानंतर १२ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर विराट सिंगने चेंडू हलक्या हाताने खेळून एक धाव काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पॉइंट रिजनला हार्दिक पंड्या क्षेत्ररक्षण करत होता. त्याने त्वरित चेंडू उचलून यष्टीवर फेकून मारला. तोवर नॉन स्ट्राईकवर असलेला डेविड वॉर्नर धाव पूर्ण करुन शकला नाही आणि तो धावबाद झाला होता.

https://twitter.com/rantworld101/status/1383472867292049411?s=20

सामन्यानंतर झालेल्या मुलाखतीत याबद्दल हार्दिक म्हणाला ,”मी नेहमी चेंडू यष्टीला मारण्याआधी खात्री करतो की, चेंडू माझ्या हातात आहे याची आणि त्यानंतर मी यष्टीवर लक्ष केंद्रित करतो. खरं सांगू तर, वॉर्नरच्या बाबतीत मी अशी आशा केलीच नव्हती की, मी इतक्या लांबून मारलेला तो चेंडू यष्टीला जाऊन लागेल. मी फक्त निशाणा साधून मारण्याचा प्रयत्न करतो होतो. नंतर मला जाणवले की तो खूप लांब होता.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “एक संघ म्हणून आमच्याकडे प्रतिभावान खेळाडू आहेत. हैदराबाद संघाने चांगली सुरुवात केली होती. परंतु आमच्या गोलंदाजांनी योग्य लाइन आणि लेंथने गोलंदाजी केली. राहुल चाहर, कृणाल आणि इतर गोलंदाजांनी एक समूह म्हणून काम केले आहे. आमच्याकडे खूप अनुभव आहे. एक संघ म्हणून खूप वर्षांपासून खेळत असलेल्या खेळाडूंची प्रतिक्रीया आणि एक कर्णधाराला लाभ होत असतो. ”

महत्त्वाच्या बातम्या-

‘हा’ खेळाडू म्हणजे मुंबई इंडियन्सचे ब्रह्मास्त्र, पाहा विरेंद्र सेहवागने कोणावर उधळली स्तुतीसुमने

RCBvKKR: कोहलीला ‘हा’ किर्तीमान करण्याची संधी, बनू शकतो आयपीएल इतिहासातील पहिलाच फलंदाज

‘आयपीएल ट्रॉफी जिंकण्याविषयी बोलणे कंटाळवाणे,’ एकदाही जेतेपद न पटकावलेल्या आरसीबीच्या खेळाडूने मोठे विधान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---