वनडे विश्वचषक 2023 साठी मंगळवारी (5 सप्टेंबर) भारतीय संघाची घोषणा केली गेली. या संघात निवडकर्त्यांनी अष्टपैलू खेलाडूंनी महत्व दिल्याचे दिसते. रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या आणि शार्दुल ठाकूर या खेळाडूंना विश्वचषकासाठी निवडले गेले आहे. हे सर्वजण गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये संघासाठी योगदान देऊ शकतात. कर्णधार रोहित शर्मा याने पत्रकार परिषदेत याबाबत स्पष्टीकरण देखील दिले.
मागच्या काही महिन्यांपासून विश्वचषकासाठी निवडला जाणारा भारतीय संघ, हा मुद्दा चर्चेत आहे. आशिया चषक 2023 साठी संघ घोषित करताना कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. मगच्या काही वर्षांपासून निवडकर्ते आणि कर्णधारांनी पत्रकार परिषद घेतली नसल्यामुळे याला एक चांगला निर्णय म्हटले गेले. वनडे विश्वचषकासाठी संघ घोषित करतानाही या दोघांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
कर्णधार रोहित शर्मा याने मंगळवारी या पत्रकार परिषदेत संघ घोषित केल्यानंतर संघातील अष्टपैलू खेळाडूंबाबत प्रतिक्रिया दिली. सोहतच हार्दिक पंड्याचे संघातील महत्व देखील बोलून दाखवले. “बॅट आणि बॉल या दोन्हींमध्ये योगदान देऊ शकणारे खेळाडू संघाची खरी संपत्ती आहेत. हार्दिक पंड्या संघासाठी निर्णायक ठरणार आहे. गेल्या एका वर्षात त्याने ज्या प्रकारे फलंदाजी आणि गोलंदाजी केली, ते प्रदर्शन संघासआठी महत्वाचे ठरले.”
विश्वचषकासाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव , रवींद्र जडेजा, अक्षर पटेल.
महत्वाच्या बातम्या –
जडेजा अन् अक्षरला निवडण्याविषयी अजित आगरकर स्पष्टच बोलला; म्हणाला, ‘आम्ही चर्चा केली, पण…’
आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामन्यासह सुपर-4 सामने होणार शिफ्ट? मोठी बातमी आली समोर