हार्दिक पांड्या आणि क्रुणाल पांड्या, टीम इंडियासाठी खेळणारे हे दोन सख्खे भाऊ. मोठा भाऊ क्रुणाल लखनऊ सुपर जायंट्ससाठी खेळतो, तर हार्दिक मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. नुकताच या दोघांचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये दोन्ही बंधू भजन गाताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ पांड्या फॅमिलीच्या एका समारंभाचा आहे. व्हिडिओच्या सुरुवातील क्रुणाल आपल्या मुलाला कवेत घेऊन नाचताना दिसतो. यानंतर तो हार्दिक सोबत ‘हरे रामा-हरे कृष्णा’ भजन गाताना दिसतो. यावेळी दोघांनीही डिजायनर कुर्ता घातलेला असून, या समारंभात त्यांचे मित्र आणि परिवारातील सदस्यही उपस्थित होते.
Hardik & Krunal Pandya singing Hare Krishna song. ⭐ pic.twitter.com/urCAsmp8bi
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 9, 2024
येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनल्यापासून हार्दिक पांड्यासाठी सर्वकाही ठीक चाललेलं नाही. एकीकडे चाहते त्याच्याविरोधात जोरदार हुटिंग करत आहेत, तर दुसरीकडे मुंबईची या हंगामाची सुरुवातही फार खराब झाली आहे. मुंबईनं आपले पहिले तीन सामने गमावल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चौथ्या सामन्यात पहिला विजय नोंदवला. आयपीएल 20214 च्या खराब सुरुवातीनंतर हार्दिक पांड्या देवाच्या शरणी गेला होता. त्यानं गुजरातच्या सोमनाथ मंदिरात जाऊन पूजा-अर्चना केली होती. या दरम्यान त्यानं रुद्राभिषेकही केला होता. यानंतर झालेल्या सामन्यात मुंबईनं दिल्लीवर विजय मिळवला.
दुसरीकडे, क्रुणाल पांड्यासाठी देखील आयपीएलचा हा हंगाम आतापर्यंत संमिश्र राहिला आहे. हंगाम सुरु होण्यापूर्वी त्याला लखनऊ सुपर जायंट्सच्या उपकर्णधार पदावरून हटवण्यात आलं. सुरुवातीच्या सामन्यांमध्येही त्याची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही. मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये त्यानं आपल्या कामगिरीत सुधारणा केली आहे. त्यानं बॅट आणि बॉलनही चांगलं प्रदर्शन केलं आहे.
गुणतालिकेबाबत बोलायचं झालं तर, आयपीएल 2024 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सची टीम 4 सामन्यांमध्ये 3 विजयासह तिसऱ्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्स तेवढ्याच सामन्यात एकमात्र विजयासह आठव्या स्थानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘सर’ जडेजानं केली ‘थाला’ची बरोबरी, एमएस धोनीचा आयपीएलमधील मोठा रेकॉर्ड धोक्यात
लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर