इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामात नव्याने सामील झालेल्या अहमदाबाद फ्रॅंचाईजीने आपल्या तीन ड्राफ्ट खेळाडुंची अधिकृत घोषणा केली आहे. सीव्हीसी कॅपिटल्स या इंग्लंडमधील प्रसिद्ध कंपनीकडे मालकी असलेल्या या फ्रॅंचाईजीने भारतीय संघाचा प्रमुख अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्यासह अफगाणिस्तानचा प्रमुख फिरकीपटू राशिद खान व भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल यांना करारबद्ध केले. यासोबतच हार्दिक पंड्या याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली.
फ्रॅंचाईजीने केली घोषणा
अहमदाबाद फ्रॅंचाईजीचे संचालक इंग्लंडचे माजी फलंदाज विक्रम सोलंकी यांनी आपल्या तीनही ड्राफ्ट खेळाडूंची घोषणा केली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, हार्दिक व राशिद यांना प्रत्येकी १५ कोटी तसेच शुबमन गिलला ८ कोटी रकमेमध्ये करारबद्ध केले गेले आहे. तसेच, हार्दिक संघाचा कर्णधार असणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
नेतृत्वाचा नाही अनुभव
भारतीय संघाचा प्रमुख अष्टपैलू असलेला हार्दिक सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. दुखापतीमुळे त्याने बीसीसीआयला काही कालावधीसाठी आपला विचार केला जाऊ नये असे सांगितले होते. असे असले तरी, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो एक आदर्श खेळाडू म्हणून मानला जातो. आक्रमक फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करण्यास तो सक्षम आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघासाठी तसेच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी त्याने नेहमी चमकदार कामगिरी केली आहे. मात्र, त्याला कोणत्याही स्तरावर नेतृत्वाचा अनुभव नाही.
अशी राहिली आहे आयपीएलमधील कामगिरी
हार्दिक आयपीएलमध्ये केवळ मुंबई इंडियन्स संघासाठी खेळला आहे. २०१५ ते २०२१ अशी सात वर्ष तो मुंबई संघाचा भाग राहिला. त्यापैकी चार वेळा मुंबई संघाने विजेतेपद मिळवले आहे. हार्दिकने आपल्या आयपीएल कारकिर्दीत ९२ सामने खेळले असून, यामध्ये १५२ च्या जबरदस्त स्ट्राइक रेटने त्याने १४७६ धावा बनवल्या आहेत. तर, गोलंदाजीत ४२ बळी त्याच्या नावावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
BREAKING: १७ कोटीत लखनऊकर झाला राहुल; स्टॉयनिस-बिश्नोई साथीला (mahasports.in)