आयपीएल २०२२ हंगामासाठी प्रत्येक जुन्या आयपीएल फ्रँचायझीला फक्त चार खेळाडूंना संघात कायम (रिटेन) ठेवता येणार होते. अशात आयपीएल फ्रँचायझींनी देखील त्यांनी रिटेन केलेल्या चार खेळाडूंची माहिती दिली आहे. मुंबईने ज्या चार खेळाडूंना पुढच्या वर्षासाठी रिटेन केले, त्यामध्ये भारताचा दिग्गज अष्टपैलू हार्दिक पंड्याचा समावेश नाही. याच पार्श्वभूमीवर हार्दिकने आता एक खास आणि भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे.
मुंबईने पुढच्या हंगामासाठी रिटने केलेल्या खेळाडूंमध्ये संघाचा कर्णधार रोहित शर्मा, दिग्गज अष्टपैलू कारयन पोलार्ड, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादव यांचा समावेश आहे. पुढच्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने मागच्या अनेक वर्षांपासून संघाचा महत्वाचा भाग असलेल्या कृणाल आणि हार्दिक या पंड्या बंधूंना संघातून मुक्त केले.
हार्दिकने त्याचे आयपीएल पदार्पण २०१५ मध्ये केले होते. यानंतर त्याने अष्टपैलूच्या रूपात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. हार्दिकने मुंबई इंडियन्ससोबत २०१५, २०१७, २०१९, २०२० असे एकूण चार जेतेपद जिंकले. असे असले तरी, मुंबईने त्याला पुढच्या हंगामासाठी रिटने केले नाही.
हार्दिकने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी या आठवणींना नेहमी, संपूर्ण आयुष्यभर माझ्यासोबत ठेवीन. मी या क्षणांना कायम माझ्या जवळ ठेवीन. येथे जे मित्र मी बनवले आहेत, जी नाती मी बनवली आहेत, लोक, चाहते मी नेहमी त्यांचा आभारी राहील. मी फक्त एका खेळाडूच्या रूपातच चांगला नाहीय, पण एका व्यक्तीच्या रूपातही चांगाला आहे. मी याठिकाणी एका युवा खेळाडूच्या रूपात मोठ्या स्वप्नांसोबत आलो होतो. आम्ही एकत्र जिंकलो, आम्ही एकत्र हारलो, आम्ही एकत्र संघर्ष केला. या संघासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्या मनात एका खास ठिकाणी आहे. सगळेच म्हणतात चांगल्या गोष्टींचा शेवट होणारच असतो, पण मुंबई इंडियन्स नेेहमीच माझ्या मनात असेल.”
https://www.instagram.com/p/CW-xB-JKh6L/
दरम्यान, हार्दिक मागच्या जवळपास दोन वर्षांपासून खराब फॉर्म आणि दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्याने यादरम्यानच्या काळात खूपच कमी गोलंदाजी केली. तरीदेखील त्याला टी-२० विश्वचषकात खेळण्याची संधी दिली होती, पण त्याने विश्वचषकात देखील काहीच खास प्रदर्शन केले नाही. आता हार्दिक सध्या भारतीय संघातून बाहेर आहे आणि मुंबईनेही त्याला संघातून बाहेर केले आहे. अशात पुढच्या वर्षी कोणती फ्रँचायझी हार्दिकवर बोली लावते आणि त्याला विकत घेते हे पाहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
दुसऱ्या सामन्यापूर्वी वृद्धिमान साहाच्या फिटनेसबद्दल विराटचे मोठे वक्तव्य, साहाचा देखील खास मेसेज
“अगदी मनासारखे घडलेय”; रिटेन झाल्यावर आली ‘स्पीडस्टार’ उमरानची पहिली प्रतिक्रिया
‘तुम्ही माझे आयुष्य बदलले’; ईशानने मुंबईसाठी पोस्ट केला भावनिक व्हिडिओ