विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले. या स्पर्धेनंतर भारताला ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी20 मालिका खेळायची आहे. त्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाईल. त्यानंतर भारताला मायदेशात देखील काही मालिका खेळायच्या आहेत. मात्र, या सर्व मालिकांमधून भारताचा प्रमुख अष्टपैलू हार्दिक पंड्या बाहेर झाला आहे. आता तो थेट आयपीएलमधूनच पुनरागमन करेल.
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात त्याच्या डाव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो मैदानाबाहेर पडला होता. पंड्या त्यानंतर एकही सामना खेळला नाही. त्यानंतर त्याला उपचारासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, बंगळुरू येथे पाठवले गेले. 2 आठवड्यांपूर्वी पंड्या नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसला होता. पहिल्या 3 चेंडू टाकल्यानंतर त्याला कोणताही त्रास झाला नव्हता. मात्र, चौथ्या चेंडूवर त्याच्या घोट्याला वेदना झालेल्या. त्यानंतर तो विश्वचषकातून बाहेर झालेला. तसेच, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी त्याला संघात स्थान मिळाले नाही. त्यानंतर होणारा दक्षिण आफ्रिका दौरा व अफगाणिस्तानविरुद्धची टी20 मालिका यात तो खेळणार नाही.
हार्दिकवर या काळात कोणतीही शस्त्रक्रिया होणार नाही मात्र तो पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी आणखी दोन महिने घेईल. त्यानंतर भारतीय संघ थेट कसोटी मालिका खेळणार असल्याने, हार्दिक आयपीएलमध्ये दिसेल.
हार्दिक आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करतो. त्याच्या नेतृत्वात गुजरात संघाने 2022 आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावले होते. तर, मागील वर्षी देखील संघ अंतिम फेरीत पोहोचला होता.
(Hardik Pandya likely to make his return in IPL 2024)
महत्वाच्या बातम्या –
पराभवानंतर भारतीय गोलंदाजाच्या घराला पोलीस सुरक्षा, चिडलेल्या चाहत्यांमुळे आधीच घेतली खबरदारी
आयसीसीचा श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला तात्पुरता दिलासा, खेळण्याची दिली परवानगी पण…