भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) मागील काही काळापासून संघातून बाहेर आहे. टी२० विश्वचषक २०२१ (T20 World cup 2021) पासून तो आपल्या संघातील स्थानावरून चर्चेत आहे. आता तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. रेसलिंगमध्ये हार्दिकसारखा खेळाडू दिसला आहे. या खेळाडूचे नाव कार्मेलो हेस (Carmelo Hayes) आहे. हे दोघेही सारखेच दिसत असल्याने सध्या जोरदार चर्चेत आहेत. कार्मेलो हेसने स्वत: हार्दिकसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने फोटोच्या खाली दोघांची नावे लिहिली आहेत आणि हॅंडशेकचा इमोजी टाकला आहे.
हार्दिक पंड्या यावर्षी आयपीएलमध्ये अहमदाबाद संघाकडून खेळताना दिसणार आहे. टी२० विश्वचषक २०२१ नंतर हार्दिकने एकही सामना खेळलेला नाही. तो त्याच्या फिटनेसवर काम करत आहे. बीसीसीएय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) हार्दिकला रणजी करंडक स्पर्धा खेळण्याचा सल्ला दिला होता. परंतु त्याने रणजी करंडक स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाच्या निवडकर्त्यांच्या मते, हार्दिकला देशांतर्गत सामने खेळून आपली तंदुरुस्ती सिद्ध करावी लागेल. त्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल.
सन २०२१ च्या टी२० विश्वचषकात हार्दिक काही खास कामगिरी करू शकला नव्हता. त्यानंतर त्याला अनेकांच्या टीकांना सामोरे जावे लागले. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात हार्दिक गोलंदाजी करण्यास देखील तंदुरुस्त नव्हता. तसेच न्यूझीलंविरुद्धच्या सामन्यात देखील तो खास कामगिरी करू शकला नव्हता. आता आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली तरच हार्दिकला भारतीय संघात स्थान मिळणार आहे.
हार्दिकऐवजी भारतीय संघात व्यंकटेश अय्यरला स्थान देण्यात आले आहे. व्यंकटेशने मागील काही सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. त्याने फिनिशरच्या म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच त्याने गोलंदाजीतही विकेट घेतल्या.
कार्मेलो हेस हा २७ वर्षीय खेळाडू अमेरिकेचा रहिवासी आहे. तो सध्या एनएक्सटी उत्तर अमेरिकन चॅम्पियन आहे. तो डब्ल्यू-डब्ल्यूइ मध्येही झळकला आहे. त्याचे नाव क्रिश्चियन ब्रिघम आहे, परंतु कोर्टात त्याला कार्मेलो हेस या नावाने ओळखले जाते. त्याने ट्वीट करत लिहिले आहे की, “हार्दिकमुळे भारतात लोकप्रियता मिळत आहे. खूप प्रेम.”
https://twitter.com/Carmelo_WWE/status/1496175118447480836
कार्मेलोची ही पोस्ट चाहत्यांना भलतीच आवडली आहे. ही पोस्ट वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ संघांतील सामन्याने होणार आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात? वाचा सविस्तर
श्रीलंकेविरुद्ध नाबाद ७४ धावा करणाऱ्या अय्यरचे चाहते बनले गावसकर; जोकोविच, फेडररशी केली तुलना