---Advertisement---

हार्दिक-नताशाच्या मुलाची कस्टडी कुणाकडे रहणार? पहा काय सांगतेय हार्दिकची पोस्ट

On: शुक्रवार, जुलै 19, 2024 8:00 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक अधिकृतपणे वेगळे झाले आहेत. पांड्या आणि नताशाने घटस्फोटाच्या वृत्तांना निश्चिती दिली आहे. पण आता त्यांचा मुलगा अगस्त्य कोणासोबत राहणार हा प्रश्न आहे. पांड्या आणि नताशा यांनी त्यांच्या संबंधित सोशल मीडिया हँडलवर तीच पोस्ट शेअर केली असून त्यात अगस्त्यचा उल्लेखही केला आहे. पांड्या आणि नताशा दोघे मिळून अगस्त्याला सांभाळतील. यावर दोघांचेही एकमत झाले आहे.

पांड्या आणि नताशाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात अगस्त्यबाबत घेतलेल्या निर्णयाचा समावेश आहे. या दोघांनी लिहिले आहे की, “अगस्त्य आमच्या दोघांच्याही आयुष्याचा महत्त्वाचा भाग राहील.” आम्ही त्याचे पालन करू आणि त्यांच्या प्रत्येक सुखाची काळजी घेऊ.

वास्तविक, नताशा तिच्या घरी परतली आहे. तिचे पालक सर्बियामध्ये राहतात. नताशा मंगळवारी मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. तिच्यासोबत मुलगा आगसत्यही होता. हार्दिक आणि नताशा यांचे संबंध बरेच दिवस चांगले चालले नव्हते. त्यांच्या घटस्फोटाची बातमी खूप आधी आली होती. आता दोघांनीही याला दुजोरा दिला आहे.

हार्दिक पांड्यासाठी गेले काही महिने खूप कठीण गेले आहेत. टीम इंडिया चॅम्पियन झाल्यानंतर त्याने याचा उल्लेख केला होता. टी20 विश्वचषक 2024 मधील विजयानंतर पांड्या खूप रडला आणि त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या. आयपीएल 2024 मध्येही पांड्याला खूप ट्रोल करण्यात आले होते.

महत्तवाच्या बातम्या-

बिग ब्रेकिंग ! अखेर हार्दिक पांड्या आणि नताशा यांचा घटस्फोट, हार्दिकने स्वतः दिली माहिती
याला दुर्दैव असेच म्हणावे का? टी20मध्ये जबरदस्त कामगिरी, तरीही दिग्गज खेळाडूचा श्रीलंका दौऱ्यातून वगळले
अखेर न्याय मिळाला! कारण नसतानाही वगळलेल्या भारतीय दिग्गजाचे टीम इंडियात कमबॅक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---