---Advertisement---

हार्दिक पांड्याला वनडे संघातून वगळलं, बीसीसीआयने सांगितलं मोठं कारण

On: शनिवार, जानेवारी 3, 2026 6:05 PM
---Advertisement---

बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा केली आहे. या मालिकेसाठी शुभमन गिलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, उपकर्णधार म्हणून श्रेयस अय्यरचे संघात पुनरागमन झाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दुखापतीमुळे श्रेयस अय्यर खेळू शकला नव्हता. मात्र आता तो तंदुरुस्त झाला असून पुन्हा एकदा नेतृत्व गटात स्थान मिळाले आहे.

या वनडे मालिकेसाठी निवड करण्यात आलेल्या संघात बहुतांश तेच खेळाडू आहेत, ज्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत सहभाग घेतला होता. मात्र या स्क्वाडमधील सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला संघात स्थान न देणे. याबाबत बीसीसीआयने स्पष्ट कारणही दिले आहे.

बीसीसीआयने सांगितले हार्दिकला वगळण्यामागचे कारण

बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमधील अधिकाऱ्यांनी हार्दिक पांड्याला एका सामन्यात पूर्ण 10 षटके गोलंदाजी करण्याची परवानगी दिलेली नाही. याशिवाय, आगामी आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 लक्षात घेता हार्दिकच्या वर्कलोडचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. त्यामुळेच त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवडण्यात आलेले नाही. बीसीसीआयचा संपूर्ण भर हा हार्दिक टी20 वर्ल्ड कपपूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त राहावा, यावर आहे.

हार्दिक पांड्याने नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याने मालिकेत दोन अर्धशतके झळकावली होती आणि गोलंदाजीमध्येही तीन महत्त्वाचे विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताला ही मालिका जिंकण्यात मोठी मदत झाली होती. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांत सामना फिरवण्याची क्षमता हार्दिककडे आहे.

हार्दिक पांड्याने भारतीय संघासाठी शेवटचा वनडे सामना 2025 साली चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळला होता. त्यानंतर तो वनडे संघाबाहेर आहे.

न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघ

शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, नितीश कुमार रेड्डी, यशस्वी जयसवाल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---