बेंगलोर । काल विराट कोहलीच्या राॅयल चॅलेंजर बेंगलोरने रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला १४ धावांनी पराभुत केले. या सामन्यात दोन विकेट्स घेणाऱ्या टीम साउदीला सामनावीर म्हणून घोषीत करण्यात आले.
याच सामन्यात मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पंड्याने शेवटच्या क्षणापर्यंत लढा दिला. त्याने गोलंदाजीत ३ षटकांत २८ धावा देत ३ विकेट तर घेतल्याच शिवाय फलंदाजीत त्याने ४२ चेंडूत ५० धावा करताना शेवटपर्यंत लढत दिली.
यामुळे आयपीएलमध्ये सामन्यात ३ विकेट घेणारा तसेच ५० धावा करणारा ९वा खेळाडू ठरला. तर मुंबई इंडियन्सकडून केराॅन पोलार्ड (२०१२) नंतरचा दुसरा खेळाडू ठरला आहे.
यापुर्वी शेन वाॅटसन (२००८, २०११), युसुफ पठाण (२००८), युवराज सिंग (२००९, २०११, २०१४), पाॅल वल्थाटी (२०११), ख्रिस गेल (२०११), केराॅन पोलार्ड (२०१२), जेपी ड्यूमिनी (२०१५), आणि स्टोनिक (२०१६) यांनी ही कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-म्हणून षटकार किंग युवराज दादाची कीट बॅग आवरायचा
–भारताचे आयसीसी कसोटी क्रमवारीत मक्तेदारी कायम
–एकदिवस सौरव गांगुली होणार बंगालचा मुख्यमंत्री!
–क्रिकेटर जेव्हा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ग्लोव्हजमध्ये ठेवतो स्क्वॅशचा चेंडू…
–आज चुकीला माफी नाही, पराभूत संघासाठी पुढचा प्रवास खडतर