---Advertisement---

नताशासोबत घटस्फोटानंतर पहिल्यांदाच मुलाला भेटून हार्दिक भावूक; फोटो पोस्ट करत लिहिले…

Hardik And Agastya Pandya
---Advertisement---

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यासाठी या वर्षाची सुरुवात खास नव्हती. त्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आले. मात्र, चाहत्यांना एमआय व्यवस्थापनाचा हा निर्णय अजिबात आवडला नाही. अशा स्थितीत हार्दिकला सामन्यादरम्यान चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्याला रस्त्यावरून सोशल मीडियापर्यंत विरोधाचा सामना करावा लागला. यानंतर पंड्याच्या वैयक्तिक आयुष्यातही उलथापालथ झाली.

पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत पंड्याचा मुलगा अगस्त्य त्याच्या आईसोबत राहत आहे. ही पिता-पुत्राची जोडी वेळोवेळी भेटत असते. पंड्याने रविवारी (22 सप्टेंबर) मुलगा अगस्त्याची भेट घेतली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.

आपल्या मुलाला भेटल्यानंतर पंड्याच्या आनंदाला पारावार उरला नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तो अगस्त्यला आपल्या मांडीत पकडलेला दिसला. यानंतर तो आपल्या मुलासोबत कारमध्ये बसला. यावेळी दोघांनी खूप धमाल केली. अगस्त्याशिवाय पंड्याच्या मांडीवर आणखी एक मूल आहे. आता पंड्याने अगस्त्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आनंद’. आपल्या मुलाला भेटल्यानंतर हार्दिक खूप आनंदी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हार्दिकच्या कारकिर्दीविषयी बोलायचे झाले तर, हार्दिक सध्या क्रिकेटपासून दूर आहे. जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी20 मालिकेत तो खेळताना दिसला होता. आता त्याला बांगलादेशविरुद्धच्या 3 टी20 सामन्यांच्या मालिकेतही संधी मिळू शकते. भारतीय संघाने जिंकलेल्या टी20 विश्वचषक विजयात त्याची महत्त्वाची भूमिका राहिली होती. त्यामुळे तो भारताचा पुढील कर्णधार होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अचानक त्याच्या जागी सूर्यकुमार यादव याला कर्णधार बनवण्यात आले. विशेष म्हणजे त्याने त्याच दिवशी आपण आपल्या पत्नीपासून वेगळे होत असल्याचे जाहीर केले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---