गुजरात टायटन्सने आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यात बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जला मात दिली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातने चेन्नई सुपर किंग्जला 5 विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात गुजरातचा प्रमुख फिरकीपटू राशिद खान याने फलंदाजी व गोलंदाजीत आपले योगदान दिले. त्यानंतर गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या याने त्याचे तोंडभरून कौतुक केले.
गुजरातने मिळवलेल्या पहिल्या विजयात राशिद खान याचे मोलाचे योगदान राहिले. त्याने प्रथम गोलंदाजीमध्ये 4 षटकात 26 धावा देत 2 फलंदाजांना तंबूत पाठवले होते. त्यानंतर फलंदाजीला आल्यावर त्याने झटपट 3 चेंडूंमध्ये 10 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. याच कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. सामन्यानंतर बोलताना संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने त्याचे कौतुक केले. तो म्हणाला,
“जेव्हा राशिद खानसारखा खेळाडू तुमच्या संघात असतो, तेव्हा तुमची चिंता काहीशी कमी होते. गोलंदाजीला आल्यावर तो प्रत्येक वेळी बळी मिळवतोच. तर संघाला गरज असते त्यावेळी फलंदाजीत देखील त्याचे योगदान मिळते. प्रत्येकाला असा खेळाडू आपल्या संघात हवा असतो.”
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याच विचार केला, तर नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जला प्रथम फलंदाजी करावी लागली. 20 षटकांमध्ये सीएसकेने 7 बाद 178 धावा केल्या. यामध्ये सलामीवीर ऋतुराज गायकवाड याचे योगदान सर्वात महत्वाचे ठरले. ऋतुराजने 50 चेंडूत ताबडतोड 92 धावा कुटल्या. प्रत्युत्तरात गुजरातने हे लक्ष्य 19.2 षटकात 5 विकेट्सच्या नुकसानावर गाठले. गुजरातसाठी शुबमन गिल याने सर्वाधिक 63 धावांचे योगदान दिले
(Hardik Pandya Praised Rashid Khan After Win Against Chennai Super Kings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाणेफेकीवेळी रवी शास्त्रींकडून मोठी चूक, पंड्याला म्हटले ‘या’ महिला संघाचा कर्णधार, तोही हसला; Video
पंड्यालाही भरली पुणेकर ऋतुराजची धडकी; विजयानंतर म्हणाला, ‘असं वाटत होतं आम्ही त्याला…’