भारत दौऱ्यावर न्यूझीलंड संघाला वनडे मालिकेत सपाटून पराभवाचा सामना करावा लागला. भारताने वनडे मालिका 3-0 ने नावावर केली होती. मात्र, शुक्रवारी (दि. 27 जानेवारी) रांची येथे 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाला पराभूत करत मालिकेत आघाडी घेतली. भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाला असला तरी, संघाचा अष्टपैलू वाशिंग्टन सुंदर याने अफलातून कामगिरी केली. खेळाच्या तिन्ही विभागात त्याने आपले सर्वोत्तम योगदान दिले. त्यानंतर भारताचा कर्णधार हार्दिक पंड्या याने देखील त्याची स्तुती केली.
वॉशिंग्टन सुंदर याने या सामन्यात भारतासाठी आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळ दाखवला. त्याने सुरुवातीला 4 षटके टाकताना केवळ 22 धावा देत दोन महत्त्वपूर्ण बळी मिळवले. तसेच, एक नेत्रदीपक झेलही टिपला. त्यानंतर फलंदाजीत भारताचे सर्व प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर त्याने एकाकी झुंज देत टी20 कारकिर्दीतील पहिले अर्धशतकही पूर्ण केले.
त्याच्या याच उत्कृष्ट कामगिरीचे कर्णधार हार्दिक पंड्याने कौतुक केले. तो म्हणाला,
”काल वॉशिंग्टनने अप्रतिम खेळ दाखवला. त्याने ज्याप्रकारे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात योगदान दिले ते कौतुकास्पद होते. त्याच्या खेळावरून असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही की, हा सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड नसून, वॉशिंग्टन सुंदर विरुद्ध न्यूझीलंड असा होता.”
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 176 धावा चोपल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला फक्त 155 धावाच करता आल्या. त्यामुळे न्यूझीलंडने हा सामना 21 धावांनी जिंकला. मालिकेतील दुसरा सामना 29 जानेवारी रोजी लखनऊ येथे खेळला जाईल.
(Hardik Pandya Praised Washington Sundar Said It’s Not India Vs Newzealand It’s Washington Sundar Vs Newzealand)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडे क्रिकेटचा सगळ्यात मोठा मॅचविनर टी20त ठरतोय फ्लॉप, करिअर येणार धोक्यात?
सगळं खोटं! ना 50 कोटींचा बंगला, ना महागड्या गाड्या; राहुल-अथियाला लग्नात दमडीही मिळाली नाही