---Advertisement---

RR vs MI: पांड्याचा रुद्रावतार! मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर कर्णधाराने नेमकं कोणाला धरलं जबाबदार?

On: बुधवार, एप्रिल 8, 2026 9:19 AM
---Advertisement---

आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या एकतर्फी पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या स्पष्टपणे नाराज दिसला. हंगामातील पहिला सामना जिंकल्यानंतर मुंबईला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.

पावसामुळे जवळपास दोन तास उशिरा सुरू झालेल्या या सामन्यात टॉस जिंकून हार्दिक पांड्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे सामना 11-11 षटकांचा करण्यात आला. मात्र, राजस्थानच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच मुंबईच्या गोलंदाजांवर आक्रमण चढवले. यशस्वी जायसवाल (32 चेंडूत 77 धावा) आणि तरुण वैभव सूर्यवंशी (14 चेंडूत 39 धावा) यांनी मुंबईच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली.

सामन्यानंतर बोलताना हार्दिक पांड्याने गोलंदाजांवरच नाराजी व्यक्त केली. “पॉवरप्लेमध्ये आम्ही योग्य त्या लाईन-लेंथने गोलंदाजी करू शकलो नाही. राजस्थानच्या सलामीवीरांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. गोलंदाजांनी जबाबदारी घ्यायला हवी. हा पराभव मी फलंदाजांवर टाकणार नाही, कारण गोलंदाजी युनिट अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाही,” असे तो म्हणाला.

तथापि, हार्दिकने वैभव सूर्यवंशीच्या खेळीचे कौतुकही केले. “15-16 वर्षांचा मुलगा अशा प्रकारे खेळतो, हे खूपच विशेष आहे. त्याची निडरता आणि फलंदाजी पाहून आनंद वाटतो,” असे म्हणत त्याने सूर्यवंशीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, राजस्थानचा कर्णधार रियान परागने जयस्वाल आणि सूर्यवंशी ही जोडी स्पर्धेतील सर्वोत्तम सलामी जोडी असल्याचे म्हटले. सामन्यात राजस्थानने 11 षटकांत 3 बाद 150 धावांचा डोंगर उभा केला आणि त्यानंतर मुंबईला 123/9 वर रोखत 27 धावांनी विजय मिळवला.

या विजयासह राजस्थानने सलग तिसरा सामना जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्ससमोर आता पुनरागमनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पुढील सामन्यांमध्ये चुका सुधारत संघाला लय सापडते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---