भारतीय संघाने पाकिस्तान पाठोपाठ बुधवारी (31 ऑगस्ट) आशिया चषक स्पर्धेत हॉंगकॉंग संघाला धूळ चारली. हॉंगकॉंगविरुद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. नाणेफेक झाल्यानंतर हार्दिक पंड्या या सामन्यात खेळणार नसल्याचे समजले, जो चाहत्यांसाठी एक मोठा थक्का होता. चला तर जाणून घेऊया हार्दिक या सामन्यात का खेळला नाही.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने जेव्हा हॉंगकॉंग संघाविरुद्ध प्लेइंग इलेव्हनची माहिती दिली, तेव्हा हार्दिक पंड्या (hardik Pandya) खेळणार नसल्याचे समजले. रोहितने सांगितले की, आजच्या सामन्यात हार्दिक पंड्या खेळत नाहीये आणि त्याच्या जागी रिषभ पंत (Rishabh Pant) याला संधी दिली गेली आहे. त्याने सांगितले की, हार्दिकला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. हॉंगकॉंग संघाचे आव्हान भारतासाठी जास्त कठीण नसेल, याचा अंदाज सर्वांना आधीच आला होता.
हार्दिक सध्या त्याच्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि आशिया चषकातील आगामी सामन्यांमध्ये त्याची भूमिका भारतीय संघासाठी महत्वाची असणार आहे. याच कारणास्तव हॉंगकॉंगविरुद्धच्या सामन्यात त्याला विश्रांती दिल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी रिषभ पंतला पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली नव्हती. पाकिस्तानविरुद्ध दिनेश कार्तिक यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडताना दिसला होता. भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याला हॉंगकॉंगविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल, असे सांगितले जात होते, परंतु तसे काही झाले नाही.
हॉंगकॉंगविरुद्ध निवडली गेलेली भारताची प्लेइंग इलेव्हन –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंह.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सूर्यकुमारच्या पिटाऱ्यात आऊट ऑफ सिलॅबस शॉट, खुद्द हिटमॅन रोहितकडून कौतुकाचा वर्षाव
मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाचं फळफळलं नशीब, टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात निवड
माईलस्टोन! जड्डू बनला आशिया कपमध्ये एक नंबर! दिग्गज भारतीयालाच सोडले मागे