सध्या सय्यद मुश्ताक अली ट्राॅफी (Syed Mushtaq Ali Trophy) ही स्पर्धा खेळली जात आहे. त्यामध्ये स्टार खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) धमाकेदार अर्धशतक झळकावले आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024च्या सामन्यात त्याने नाबाद 74 धावा केल्या. पांड्याच्या या खेळीच्या जोरावर कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखालील (Krunal Pandya) बडोद्याने गुजरातचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील सामना बडोदा आणि गुजरात संघात खेळला गेला. हा सामना इंदूरमध्ये खेळला रंगला होता. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 184 धावा केल्या. यादरम्यान सलामीवीर आर्या देसाईने 78 धावांची खेळी केली. तर कर्णधार अक्षर पटेलने (Axar Patel) नाबाद 43 धावा केल्या. बडोद्याकडून गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) 1 विकेट्स घेतली.
गुजरातने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना बडोद्याने 19.3 षटकांत सामना जिंकला. संघाने हा सामना 5 विकेट्सने जिंकला. यादरम्यान शिवालिक शर्माने 64 धावांची खेळी केली. दरम्यान त्याने 7 चौकारांसह 2 षटकार ठोकले. त्याच्यासोबत हार्दिक पांड्यानेही तुफानी खेळी खेळली.
हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) नाबाद 74 धावा केल्या. दरम्यान त्याने 6 चौकारांसह 5 षटकार मारले. हार्दिकच्या या खेळीच्या जोरावर बडोद्याने शानदार विजयाची नोंद केली. बडोदा संघाचा कर्णधार कृणाल पांड्या (Krunal Pandya) फलंदाजीत विशेष काही करू शकला नाही. तो 3 धावा करून बाद झाला. गुजरातकडून रवी बिश्नोईने (Ravi Bishnoi) 2 विकेट्स घेतल्या. तेजस पटेल (Tejas Patel), अर्जुन नागवासवाला आणि चिंतन गजा यांनी प्रत्येकी 1-1 विकेट्स आपल्या नावावर केली.
महत्त्वाच्या बातम्या-
जयस्वाल-राहुलच्या शानदार खेळीनंतर ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणाले, “आज खेळपट्टी खूप…”
तिलक वर्माने झंझावाती शतक झळकावून रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू!
IND vs AUS; “चेंडू खूप हळू येतोय” जयस्वालने केली स्टार्कची बोलती बंद!