Hardik Pandya :- भारताचा श्रीलंका दौरा शनिवारपासून (27 जुलै) सुरू होत (India Tour Of Sri Lanka) असून उभय संघात पल्लेकल्ले स्टेडियमवर पहिला टी20 सामना होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय खेळाडू जोरदार तयारी करत आहेत. मात्र सराव सत्रादरम्यान भारतीय अष्टपैलू हार्दिक पांड्या नव्या भूमिकेत दिसला. नेटवर सराव करताना हार्दिक गोलंदाजीच्या नव्या शैलीचा अभ्यास करताना दिसला. यामुळे हार्दिकला नव्या भूमिकेत उतरवणे ही प्रशिक्षक गौतम गंभीरची (Gautam Gambhir) नवी रणनिती आहे का?, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात 27 ते 30 जुलैदरम्यान तीन टी20 सामन्यांची मालिका होणार आहे. यासाठी युवा भारतीय संघ आपले नवे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि नवा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली जोरदार सराव करत आहे. प्रशिक्षक गंभीरने संघ निवड आणि निर्णयांमध्ये काही मोठे बदल केले, पण हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर त्याला नव्या अवतारात आणण्याची तयारी सुरू आहे. कारण सरावातही असेच काहीसे दिसून आले आहे.
Hardik Pandya the leg spinner in the practice session. 😄👌 pic.twitter.com/mld6IBpKYt
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 26, 2024
भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू हार्दिक श्रीलंकेत टी20 मालिकेसाठी सराव करताना एका नव्या भूमीकेत दिसला आहे. त्याने चष्मा लावला होता आणि तो नेटमध्ये वेगवान गोलंदाजी करण्यापेक्षा काहीतरी वेगळे करत होता. टी20 विश्वचषक 2024 मध्ये, पांड्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने अनेक महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. परंतु श्रीलंकेत सराव करताना तो लेग स्पिन गोलंदाजी करताना दिसला. हे दृश्य पाहिल्यानंतर गंभीरने काही नवीन रणनीती आणली आहे का?, असा प्रश्न चाहते विचारत आहेत.
हार्दिकला सरावादरम्यान लेग स्पिन गोलंदाजी करताना पहिल्यानंतर त्याला तंदुरुस्त ठेवण्यासाठी हे पाऊल उचलले गेले असावे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तसेच सरावात त्याच्यावर वेगवान गोलंदाजीचा भार पडू नये, म्हणून प्रशिक्षकांनी हा निर्णय घेतला असावा.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघात स्थान मिळालं नाही, आयपीएल विजेता खेळाडू गेला इंग्लंडला; काउंटी क्रिकेटमध्ये नशीब आजमावणार
आशिया चषक 2024 : सेमिफायनलमध्ये रेणुका सिंगचा कहर! भारताचा सलग नवव्यांदा फायनलमध्ये प्रवेश
पंजाब किंग्जचं नशीब बदलेल? रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दिग्गज बनू शकतो मुख्य प्रशिक्षक