---Advertisement---

IPL Auction 2021 ने हार्दिक पंड्या भावुक; व्हिडिओ शेअर करत म्हणाला, “आपल्या स्वप्नांच्या सामर्थ्याला कमी..”

On: गुरूवार, फेब्रुवारी 18, 2021 2:45 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा मिनी लिलाव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आज (१८ फेब्रुवारी) दुपारी ३ वाजता चेन्नईच्या ग्रँड चोला या पंचतारांकित हॉटेलमध्ये या लिलावाची सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी आयपीएलचा सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्स संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या याने एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे.

हार्दिकने व्हिडिओ शेअर करत त्याच्या लहानपणीपासूनचा ते आतापर्यंतच्या प्रवासाची छोटीशी झलक दाखवली आहे. यात त्याचा लहान असतानाच्या मुलाखतीचा क्लिपदेखील त्याने जोडला आहे. ज्यामध्ये तो आपण मोठे झाल्यानंतर इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांच्याप्रमाणे बडोदा संघाकडून रणजी ट्रॉफी क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच भारतीय संघाचेही प्रतिनिधित्त्व करण्याचे स्वप्न असल्याचे त्याने सांगितले आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये हार्दिकने लिहिले आहे की, ‘कधीही तुमच्या स्वप्नांच्या सामर्थ्याला कमी लेखू नका. आयपीएलचा लिलाव मला दरवेळी आठवण करून देतो की, आम्ही किती लांबचा प्रवास केला आहे.’ हार्दिकच्या या भावुक व्हिडिओला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.

https://twitter.com/hardikpandya7/status/1362279307976925187?s=20

हार्दिक पंड्याची आयपीएल कारकिर्द

हार्दिकच्या आयपीएल कारकिर्दीविषयी बोलायचे झाले तर, २०१५ साली त्याने मुंबई इंडियन्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून तो मुंबबईचाच भाग आहे. आजवर आयपीएलमध्ये त्याने एकूण ८० सामने खेळले असून १३४९ धावा आणि ४२ विकेट्सची कामगिरी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, आयपीएलमुळेच हार्दिकला भारतीय संघात स्थान मिळाले.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल लिलावाआधीच सचिनचा लेक मुंबई इंडियनच्या ताफ्यात? सोशल मीडियावर चर्चेला उधान

अश्विनच्या शतकाचं जोरदार सेलिब्रेशन करणाऱ्या सिराजला सचिन म्हणतो, ‘…म्हणून मला तुझा अभिमान आहे’

याला म्हणतात आगीत तेल ओतणे! इंग्लिश दिग्गजाने उचलून धरला कोहलीचा मुद्दा, सामना बंदीची केली मागणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---