भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांचे वडिल हिमांशू पंड्या यांचे मागील आठवड्यात निधन झाले होते. हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली होती. वडिलांचे निधन झाल्याने पंड्या बंधू साहजिकच मनाने पूर्णपणे खचले आहेत. त्यामुळे हार्दिक पंड्याने वडिलांसोबत शनिवारी घालवलेल्या प्रत्येक क्षणाचा व्हिडिओ तयार केला आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हिमांशू पंड्या यांनी अखेरचा श्वास बडोदा येथे घेतला होता. वडिलांच्या निधनानंतर कृणाल पंड्या जैव सुरक्षित वातावरणात बाहेर पडला होता आणि त्याने वडिलांचे अंत्यसंस्कार केले होते. तो सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत बडोदा संघाचे नेतृत्व करत होता. त्याचबरोबर हार्दिक पंड्या सुद्धा त्यावेळी कुटुंबासोबत होता. हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांना क्रिकेटपटू बनवण्यासाठी हिमांशू पंड्या यांनी खूप मेहनत घेतली होती.
https://www.instagram.com/tv/CKX5sdyFKW7/?igshid=tbgw2i63h8w5
हिमांशू पंड्या यांनी आपल्या मुलांना क्रिकेटपटू म्हणून घडवण्यासाठी आपले शहर सोडले होते. त्याचबरोबर त्यांनी आपल्या मुलांना घडण्यासाठी आपला बिझनेस सुद्धा बंद केला होता. ते कुटुंबाबरोबर दुसर्या शहरात येउन राहिले होते. ज्यामुळे आपल्या मुलांना क्रिकेट खेळण्यासाठी सुविधा उपलब्ध होतील. हिमांशू पंड्या हे सूरत मध्ये कार फायनेंस बिझनेस करत होते. जो बंद करून ते बडोद्याला स्थायिक झाले होते. त्यावेळी त्यांचा छोटा मुलगा हार्दिक पंड्या 5 वर्षांचा होता. या ठिकाणी येउन त्यांनी आपल्या मुलांना क्रिकेटच्या चांगल्या सुविधा निर्माण करून दिल्या. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ते भाड्याच्या घरामध्ये वास्तव्यास होते.
यापूर्वी ही हार्दिक पंड्याने वडिलांच्या निधनानंतर एक दिवसाने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केली होती . ज्यामध्ये त्याने लिहिले होते , “माझे वडील, माझे हिरो, तुम्हाला गमावले आहे. ही गोष्ट मान्य करणे, जीवनातील सर्वात अवघड गोष्टींपैकी एक आहे. परंतु तुम्ही आमच्यासाठी एवढ्या मोठ्या आठवणी सोडल्या आहेत की, आम्ही फक्त कल्पना करू शकतो की तुम्ही हसत आहात.”
https://www.instagram.com/p/CKI11AZFgf4/?igshid=489m5qq2bx26
हार्दिक पंड्याने पुढे लिहले होते , “तुमची मुले ज्या ठिकाणी उभी आहेत, ती तुमची मेहनत आणि आत्मविश्वासामुळे आहेत. तुम्ही नेहमी आनंदी होता. आता या घरात तुमच्या नसण्याने मनोरंजन कमी होणार. आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि पुढे ही करत राहू. तुमचे नाव नेहमी टॉपवर राहील. मला एक गोष्ट माहीत आहे, तुम्ही आम्हाला वरुन त्याचप्रकारे बघत आहात. ज्याप्रकारे तुम्ही इथे केले होते.”
महत्वाच्या बातम्या:
एक पाय काम करत नसतानाही देशासाठी तो दिड सत्र मैदानात लढत होता
भारत माता की जय घोषणा देत गावकऱ्यांकडून शार्दुल ठाकुरचं उत्साहात स्वागत, बघा व्हिडिओ
फक्त कर्णधार रहाणेच्या सांगण्यावरुन देशासाठी त्याने दुखापतग्रस्त असताना केली होती ५ षटकं गोलंदाजी