भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने सोशल मीडियावर आपल्या पुतण्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कवीर कृणाल पंड्या त्याच्या मांडीवर दिसत आहे. हा फोटो शेअर करत पांड्याने लिहिले आहे की, ‘या जगात स्वागत आहे बेबी कवीर. अगुला आता मोठ्या भावाचे कर्तव्य पार पाडायचे आहे.’ या कॅप्शनमध्ये पंड्याने उल्लेख केलेले ‘अगू’ हे नाव ‘अगस्त्य’ याचे आहे.
https://www.instagram.com/p/ChjGtzJKXOG/?utm_source=ig_web_copy_link
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याचा मोठा भाऊ कृणाल पंड्याची पत्नी पंखुरी शर्मा हिने नुकताच एका मुलाला जन्म दिला आहे. दोन्ही जोडप्यांनी आपल्या गोंडस मुलाचे नाव कवीर कृणाल पांड्या ठेवले आहे. या गोष्टीची माहिती स्वत: कृणाल पंड्याने आपल्या सोशल मीडियाद्वारे दिली होती.






