टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या सुपर १२ फेरीमध्ये भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभूत व्हावे लागले. या पराभवाची भरपूर कारणमीमांसा करण्यात येत आहे. त्यातच भारतीय क्रिकेट संघ आपल्या वेगवान अष्टपैलू गोलंदाजाच्या समस्येशी झुंजत आहे. भारतीय संघाला या भूमिकेसाठी हार्दिक पंड्यावर विश्वास आहे, पण तो बऱ्याच दिवसांपासून गोलंदाजीपासून दूर आहे. पण बुधवारी (२७ ऑक्टोबर) भारतीय संघाला दिलासा देणारी बातमी मिळाली आहे.
हार्दिक पंड्या नुकतेच नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करताना दिसला. हार्दिकने आगामी सामन्यांमध्ये भारतासाठी २ ते ३ षटके टाकण्याचे प्रयत्न केले, तर भारतीय संघाला सहावा गोलंदाज म्हणून एक चांगला पर्याय मिळेल.
तसे पाहता, हार्दिकच्या जागी वेगवान गोलंदाज अष्टपैलू म्हणून शार्दुल ठाकूरचा पर्याय भारतीय संघाकडे आहे. पण हार्दिक हा अनुभवी खेळाडू आहे, तो गेल्या ५ वर्षांपासून या प्रकारामध्ये भारतीय संघाकडून खेळत आहे. अशा परिस्थितीत कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापन हार्दिकला प्राधान्य देणार असल्याचे दिसत आहे.
पाकिस्तानविरुद्ध भारताला १० विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात भारताने १५१ धावा केल्या होत्या, परंतु भारतीय संघाच्या एकाही गोलंदाजाला पाकिस्तानची एकही विकेट घेता आली नाही. हार्दिक गोलंदाजीपासून दूर असल्यामुळे भारताला केवळ ५ गोलंदाजांचा वापर करता आला. जर त्यावेळी सहावा गोलंदाज म्हणून भारतीय संघाला पर्याय असता, तर संघाला पुनरागमन करण्यासाठी आणखी काही प्रयत्न करता आले असते.
भारतीय संघाला येत्या रविवारी (३१ ऑक्टोबर) न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळायचा आहे. या सामन्याच्या तयारीसाठी भारतीय संघ दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर सरावासाठी आला, तेव्हा हार्दिक पांड्या गोलंदाजीचा सराव करताना दिसला.
https://twitter.com/Sunainagosh7/status/1453395961963630601
Hardik Pandya is seen practicing bowling ahead of the game against NZ on Sunday.#IND #T20WorldCup pic.twitter.com/yoDVQUiqst
— 💙AK #MI 💙 (@ak_sr10) October 27, 2021
विश्वचषक सामन्यांचे ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सने हार्दिकची गोलंदाजीची अनेक दृश्य क्रिकेट चाहत्यांसमोर मांडली, तेव्हा क्रिकेट तज्ज्ञ आणि भारतीय चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. हार्दिक गोलंदाजीसाठी उपलब्ध झाल्यास संघाला मोठा दिलासा मिळेल, हे सर्वांनाच ठाऊक आहे. यादरम्यान हार्दिक भारतीय संघाचा मार्गदर्शक एमएस धोनीकडून गोलंदाजीचा सल्ला घेताना दिसला.
महत्त्वाच्या बातम्या –
बांगलादेशच्या फलंदाजाला स्कूप शॉट पडला महागात, असा झाला झेलबाद; पाहा व्हिडिओ