यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ (icc T20 world cup 2021) स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेत भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. या संघाला उपांत्य फेरीत देखील प्रवेश करता आला नव्हता. भारतीय संघाकडून अष्टपैलू हार्दिक पंड्या याने (Hardik Pandya) या स्पर्धेत फारशी गोलंदाजी केली नव्हती. दरम्यान, या स्पर्धेत गोलंदाजी न करण्याबाबत हार्दिक पंड्याने एक मोठा खुलासा केला आहे.
हार्दिक पंड्याने खुलासा करत म्हटले आहे की, आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत त्याची अष्टपैलू खेळाडू म्हणून नव्हे, तर फलंदाज म्हणून निवड करण्यात आली होती. हार्दिक पंड्याने केलेल्या या वक्तव्यानंतर मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा (Chetan Sharma) आता निशाण्यावर आले आहेत.
ज्यावेळी आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली त्यावेळी चेतन शर्मा यांनी म्हटले होते की, “हार्दिक पंड्याला अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच तो पूर्णपणे फिट आहे.”
परंतु, हार्दिक पंड्याने आता खुलासा करत चेतन शर्मा यांना खोटे ठरवले आहे. ज्यामुळे आता विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्या वादानंतर, हार्दिक पंड्या आणि निवडकर्ते यांचा वाद रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अधिक वाचा – ‘…म्हणून मी विश्रांती घेतली होती’, हार्दिक पंड्याने केला गौप्यस्फोट
‘बॅकस्टेज विद बोरिया’ या यूट्यूब शोमध्ये हार्दिक पंड्याने म्हटले की, “विश्वचषक स्पर्धेत आम्ही ज्या परिस्थितीत होते, त्यावरून मला असे वाटते की, सर्व दोष माझ्यावर ढकलण्यात आला होता. या संघात माझी निवड फलंदाज म्हणून करण्यात आली होती. मी पहिल्या सामन्यात गोलंदाजी करण्यासाठी भरपूर मेहनत केली होती, परंतु गोलंदाजी करू शकलो नव्हतो. दुसऱ्या सामन्यात त्यावेळी गोलंदाजी करण्याची संधी मिळाली, जेव्हा मला गोलंदाजी करायची नव्हती. ”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मला अष्टपैलू म्हणून खेळायचे आहे. काही चुकलं तर माहीत नाही. पण माझी तयारी ही अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळाडूची आहे. मी आता फिट आहे. पुढे काय होईल ते काळच ठरवेल.”
आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाविरुद्ध साखळी फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. या स्पर्धेत हार्दिक पंड्याने केवळ ४ षटके गोलंदाजी केली होती. २ षटके न्यूझीलंड संघाविरुद्ध, तर २ षटके अफगाणिस्तान संघाविरुद्ध गोलंदाजी केली होती.
महत्वाच्या बातम्या :
रोहित अँड कंपनी अहमदाबादमध्ये दाखल, ‘इतके’ दिवस खेळाडू राहाणार क्वारंटाईन
‘लीडर होण्यासाठी कर्णधार असणे गरजेचं नाही’, धोनीचे उदाहरण देत विराटचे मोठे भाष्य
वाढदिवस विशेष: एक हात मोडला असताना ग्रॅमी स्मिथ आला मैदानात, पुढे काय झाले पाहाच!