भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने सध्या सुरु असलेल्या डीवाय पाटील टी20 स्पर्धेत मंगळवारी(3 मार्च) अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्याने रिलायंस 1 कडून खेळताना नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (सीएजी) संघाविरुद्ध 39 चेंडूत 105 धावांची खेळी करण्याबरोबरच 5 विकेट्सही घेतल्या.
गट क मध्ये झालेल्या या सामन्यात हार्दिकने 37 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले होते. त्याने या सामन्यात एकूण 10 षटकार आणि 8 चौकार मारताना 105 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे रिलायंस 1 संघाने 20 षटकात 5 बाद 252 धावांचा डोंगर उभा केला.
त्यानंतर 253 धावांचा पाठलाग करताना सीएजी संघाला केवळ 151 धावाच करता आल्याने त्यांना 101 धावांनी पराभव स्विकारावा लागला. गोलंदाजी करताना हार्दिकने 5 विकेट्स घेत संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
https://twitter.com/Officialverma5/status/1234856442341011463
हार्दिक त्याच्या पाठीवर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर दुसराच सामना खेळत होता. हार्दिकच्या पाठीवर 5 महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर तो व्यावसायिक क्रिकेटपासून दूर होता. तसेच तो डीवाय पाटील टी20 स्पर्धा खेळण्याआधी बंगळुरुमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करत होता.
महत्त्वाच्या बातम्या-
–असा कारनामा करणे नक्कीच सोपं नव्हतं, पण १६ वर्षीय शेफाली करुन दाखवलंच!
–तब्बल १३ वर्षांनंतर बंगाल रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात
–न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका गमावली पण आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान राखले