भारत आणि न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना डकवर्थ लुईस नियमानुसार बरोबरीत सुटला. यासह भारतीय संघाने 3 सामन्यांची टी20 मालिका 1-0 ने जिंकली. या मालिकेत यष्टीरक्षक संजू सॅमसन व वेगवान गोलंदाज उमरान मलिक यांना संधी मिळाली नाही. अनेकांनी भारतीय संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. तर सॅमसन आणि मलिक यांना संधी का दिली नाही यावर बोलताना कर्णधार हार्दिक पंड्या याने महत्त्वाचे वक्तव्य केले.
नेपियर येथे झालेला मालिकेतील अखेरचा टी20 सामना नाट्यमयरित्या टाय झाला. तरीदेखील मालिकेतील दुसरा सामना जिंकल्याने भारतीय संघाने या मालिकेवर कब्जा केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या याने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. या संपूर्ण मालिकेत यष्टीरक्षक संजू सॅमसन व वेगवान गोलंदाज उमरान मलिक यांना का संधी देण्याविषयी तसेच या निर्णयावर टीका होत आहे असे सांगितले असता हार्दिक म्हणाला,
“प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास लोक बाहेर काय बोलतात याचा आम्ही जास्त विचार करत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे. ज्या परिस्थितीत आम्हाला जो निर्णय योग्य वाटला तो आम्ही घेतला. हा माझा संघ आहे. या संघात सर्वांना संधी मिळेल. ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी या खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याचा मौका असेल.”
सध्या संघाचा नियमित सदस्य असलेला यष्टीरक्षक रिषभ पंत सातत्याने अपयशी ठरत आहे. पंतने या मालिकेतही सपशेल निराशा केली. त्यामुळे त्याला संघातून बाहेर करण्याची मागणी होत आहे. त्याच्या जागी संजू सॅमसन हा पर्याय ठरू शकतो. तर, सातत्याने 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करणाऱ्या उमरान मलिक याला देखील अद्याप पुरेशी संधी मिळाली नाही.
(Hardik Pandya Talk On Sanju Samson And Umran Malik)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: इंग्लंडविरुद्ध दीडशतक झळकावणाऱ्या पठ्ठ्याने कच्चून मारला षटकार, वॉर्नरही पाहतच राहिला
पावसाची दादागिरी! सुपर ओव्हर न खेळवता भारत- न्यूझीलंड संघातील तिसरा टी20 सामना टाय