---Advertisement---

आगामी श्रीलंका दाैऱ्याआधीच गाैतम गंभीरची गुगली, हा स्टार होणार भारतीय संघाचा कर्णधार

Indian-Cricket-Team
---Advertisement---

टीम इंडियाचा हेड कोच होताच गाैतम गंभीर कामला लागला आहे. आगामी श्रीलंकेदाैऱ्यापासून त्याचा कार्यकाळ सुरु होणार आहे. ज्यामध्ये टीम इंडिया 3 टी20 सामने आणि तितकेच एकदिवसीय सामने खेळणार आहे. दरम्यान वृत्त अहवालानुसार या मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती हेण्यात येणार आहे. तर अश्या परिस्थितीत गाैतम गंभीर भारतीय संघाची धुरा कोणाच्या हाती सोपवणार याची चर्चा आहे.

वृत्त अहवालावर विश्वास ठेवले तर आगामी श्रीलंका दाैऱ्यासाठी टी20 मध्ये हार्दिक पांड्याची कर्णधारपदी वर्णी लागू शकते. तर एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधार रोहित शर्मा वरिष्ठ संघात नसल्याने त्याच्या जागी केएल राहुलला कर्णधापर पदाची जबाबदारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआयच्या एका सुत्राने सांगितले आहे की, आगामी श्रीलंका दाैऱ्यासाठी हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आलेली नाही. तो या टी20 मालिकेमध्ये कर्णधारपदाच्या भूमिकेत दिसण्याची शक्याता आहे. टी20 विश्वचषक 2024 मध्ये त्यांने भारतीय संघाची उपकर्णधार पदाला साजेल अशी कामगिरी केली होती. त्याने स्पर्धेत 11 विकेट्स तर 144 धावा केल्या होत्या.

रोहित शर्माला श्रीलंका दाैऱ्यासाठी विश्रांती देण्याची शक्यता आहे. त्यमुळे रोहितच्या अनुपस्थितीत एकदिवसीय सामन्यात केएल राहुलला कर्णधारपदाची जबाबदोरी देण्याची शक्यत आहे. केएल राहुलने मागील काही दिवसांत राहुलने या फाॅरमॅटमध्ये भारतीय संघासाठी शानदार कामगिरी केली आहे. मधल्या फळीत फलंदाजीसह तो यष्टीरक्षकाची देखील भूमिका साकारु शकतो.

टी20 विश्वचषकाच्या विजयानंतर भारतीय संघाचे स्टार खेळाडूंनी निवृत्ती घेतली. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यां तिघांनी टी20 आंतरराष्ट्रीय  सामन्यातून रामराम ठोकले. बीसीसीआय पुधील कालात टी20 सामन्यांसाठी युवा खेळाडूंना प्राधान्य देणार आहे.

महत्तवाच्या बातम्या-

मी कोणत्या विराट कोहलीला ओळखत नाही, स्टार फुटबाॅलपटूनी भारताच्या माजी कर्णधाराला ओळखण्यास दिला नकाररवी बिश्नोई बनला जॉन्टी रोड्स…चित्त्याप्रमाणे उडी मारून घेतला जबरदस्त झेल! पाहा VIDEO
युवा खेळाडूंचा दबदबा! तिसऱ्या टी20 सामन्यात झिम्बाब्वेला सहज धूळ चारली; मालिकेत आघाडी

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---