---Advertisement---

हार्दिकची कॅप्टन्सी भारीच! म्हणाला,’ पूर्णवेळ नेतृत्व मिळाले तर मी माझ्या मना….’

On: बुधवार, नोव्हेंबर 23, 2022 12:48 PM
Hardik-Pandya
---Advertisement---

भारतीय पुरूष क्रिकेट संघाने नुकतेच न्यूझीलंड दौऱ्यात टी20 मालिका जिंकली. तीन सामन्यांच्या या मालिकेत संघ हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखाली खेळला. यादरम्यान त्याचे नेतृत्व कसे राहिले याबाबत चर्चा सुरू झाली. त्यातच त्याला भारताच्या टी20 संघाचा पूर्णवेळ कर्णधार करावा अशी मागणीही होऊ लागली. याबाबत हार्दिकने सांगितले, जर त्याला पूर्णवेळ नेतृत्व मिळाले, तर तो कोणत्या आणि कशा योजना आखणार हे स्पष्ट केले आहे.

रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या अनुपस्थित हार्दिक पंड्या (Hardik Pandya) न्यूझीलंडच्या दौऱ्यावर संघाचा कर्णधार झाला. विश्वचषकात झालेल्या निराशाजनक कामगिरीमुळे हार्दिकला भारताच्या टी20 कर्णधारपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. याबाबत हार्दिक म्हणाला, मी आपल्या तर्हेने संघाचे नेतृत्व करणार आणि त्याच्या नेतृत्वाखाली सर्वोत्तम क्रिकेट खेळला जाईल.

महत्वाचे म्हणजे, कर्णधार म्हणून हार्दिकचा हा सलग दुसरा टी20 मालिका विजय ठरला. याआधी त्याने आंयर्लंड दौऱ्यात विजय मिळवला होता. त्याचबरोबर दिग्गज सुनील गावसकर आणि रवी शास्त्री हे पण त्याला कर्णधारपदाच्या भुमिकेत पाहण्यास उत्सुक आहेत.

“लोक म्हणत आहेत, म्हणून चांगले वाटते मात्र आतापर्यंत घोषणा झालेली नाही. खरं बोलायचे तर मी सोप्या पद्धतीने गोष्टी करतो. जेव्हा-जेव्हा मला संधी दिली गेली तेव्हा-तेव्हा मी तसाच खेळ केला, जसा मला करायचा होता. नेतृत्वाचे म्हणाल तर मी एका सामन्यात करेल किंवा एका मालिकेत, खेळणार मात्र मनाप्रमाणेच,” असे विधान हार्दिकने केले आहे.

हार्दिकचे नेतृत्व इंडियन प्रीमियर लीगमध्येही (आयपीएल) पाहिले आहे. त्याने गुजरात टायटन्सचे कर्णधारपद 2022च्या आयपीएल हंगामात केले. तेव्हा त्याची नेतृत्व करण्याची ती पहिलीच वेळ होती आणि गुजरात संघाने पदार्पणाच्या हंगामात विजेतेपद पटकावले. यानंतर त्याच्याकडे भारताच्या भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिले जात आहे.

न्यूझीलंडच्या दौऱ्यातील पहिला टी20 सामना पावसामुळे रद्द झाला, तर दुसरा सामना भारताने जिंकला आणि तिसरा सामना पावसामुळे डकवर्थ लुईसच्या नियमानुसार बरोबरीत राहिला. Hardik Pandya told about his captaincy plan

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पैसे मिळो अथवा न मिळो! आयपीएलमध्ये खेळायचेच, इंग्लंडच्या स्टार खेळाडूची तीव्र इच्छा
तुफानी फलंदाजी! वनडेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---