सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात पराभव पत्कारावा लागला. यासह चार सामन्यांच्या मालिकेत आफ्रिकेनं 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
प्रथम फलंदाजी करताना भारतानं यजमानांपुढे विजयासाठी 125 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारतासाठी हार्दिक पांड्यानं 39 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. मात्र हा अष्टपैलू खेळाडू त्याच्या खराब स्ट्राईक रेटमुळे खूप ट्रोल झाला. पांड्या आगामी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑडिशन देत असल्याचं चाहते म्हणाले. भारतानं दिलेले हे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेनं 19व्या षटकात गाठलं आणि सामना 3 गडी राखून जिंकला.
हार्दिक पांड्यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 45 चेंडूत 39 धावांची खेळी खेळली, ज्यामध्ये त्यानं चार चौकार आणि एक गगनचुंबी षटकार ठोकला. भारतानं 8 षटकांत 45 धावांवर 4 विकेट गमावल्या असताना हा स्टार अष्टपैलू फलंदाज क्रिजवर आला. यानंतर अक्षर पटेल आणि रिंकू सिंह हे दोघेही पॅव्हेलियनमध्ये परतल्यानं हार्दिकला शेवटपर्यंत टिकून राहणं आवश्यक झालं.
हार्दिक पांड्यानं शेवटच्या तीन षटकांमध्ये 10 डॉट बॉल्स खेळले, ज्यामुळे संघाची स्थिती आणखी बिकट झाली. त्यानं चौकार मारून डावाचा शेवट केला आणि भारताची धावसंख्या 124/6 पर्यंत नेली. या सामन्यात हार्दिक पांड्याचा स्ट्राईक रेट 86.67 होता. यासह तो एका डावात किमान 40 चेंडू खेळलेल्या खेळाडूंच्या यादीत सर्वात कमी स्ट्राइक रेटनं फलंदाजी करणारा भारताचा तिसरा खेळाडू ठरला. या यादीत ईशान किशन अव्वल स्थानावर आहे.
टी20 मध्ये भारतासाठी सर्वात कमी स्ट्राईक रेट (कमीत कमी 40 चेंडू)
ईशान किशन 35(42) – 83.33, विरुद्ध वेस्ट इंडिज, कोलकाता 2022
दिनेश मोंगिया 38(45) – 84.44 ,विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग 2006
हार्दिक पांड्या 39*(45) – 86.67, विरुद्ध दक्षिण आफ्रिका 2024
केएल राहुल 51*(56) – 91.07 विरुद्ध दक्षिण आफ्रिका, त्रिवेंद्रम 2022
हेही वाचा –
वरुण चक्रवर्तीची शानदार कामगिरी वाया, रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीपूर्वी भारताला मोठा झटका! रोहित शर्मा बाहेर
IND vs SA; भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 125 धावांचे आव्हान!