चेन्नई l येथे काल झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे ऑस्ट्रेलियाला २६ धावांनी मात दिली. भारताने निर्धारित ५० षटकांत २८१ धावा केल्या होत्या. परंतु डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे ऑस्ट्रेलिया समोर २१ षटकांत १६४ धावांचे लक्ष ठेवण्यात आले होते. पण पंड्या आणि फिरकी गोलंदाज चहल व कुलदीपच्या गोलंदाजी पुढे ऑस्ट्रलियाच्या फलंदाजीने नांगी टाकली. ऑस्ट्रेलियाला २१ षटकांत ९ बाद १३७ धावांपर्यंतच मजल मारता आली.
या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोनी मध्ये चमकदार कामगिरी केली ती म्हणजे भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने. त्याने भारताला बिकट परिस्थितीतून फक्त बाहेरच नाही काढले तर दमदार फटकेबाजी करून भारताला सन्मानित धावसंख्ये पर्यंतही नेले. त्याने ६६ चेंडूत ५ षटकार आणि ५ चौकार लगावत ८३ धावा केल्या.
पण कालचा सामना बघताना आपल्या एक लक्षात आले असेल की पंड्याने काल फलंदाजी करताना भारतीय संघाची जर्सी तर घातली होती पण ग्लोव्ज मात्र भारतीय संघाचे नव्हते. पंड्याने त्याच्या आयपीएल संघ म्हणजेच मुंबई इंडियन्सचे ग्लोव्ज घातले होते.
पंड्याच्या मते त्याच्यासाठी ते ग्लोव्ज खूप लकी आहेत. म्हणून तो ते घालूनच खेळतो. त्याच्या यशाची सर्व श्रेय तो त्याचा आयपीएल संघ मुंबई इंडियन्सला देतो.
पंड्या आता भारतभर एक स्टार खेळाडू म्हणून प्रसिद्ध झाला आहे . त्याच्या या प्रसिद्धीची सुरुवात २०१५ मध्ये जेव्हा तो मुंबई इंडियन्सच्या संघाकडून आयपीएल खेळायला लागला तेव्हा झाली. पहिल्या मोसमात त्याला लक्षवेधी कामगिरी करता आली नाही पण पुढच्या दोन मोसमात त्याने आपला खेळ असा काही उंचावला की त्याचे भारताच्या टी-२० संघात स्थान निश्चित झाले. त्यानंतर त्याला वनडे मध्ये ही संधी मिळू लागली आणि आता तो भारताकडून वनडे संघात ही चांगली कामगिरी करत आहे. श्रीलंका दौऱ्या त्याला भारताच्या कसोटी संघातही स्थान देण्यात आले होते आणि त्याने तेथेही चांगली कामगिरी केली आहे.
पंड्याने काल मुंबई इंडियन्सचे ग्लोव्ज घातल्यामुळे चेन्नई सुपर किंग्सने खास ट्विट केला. ज्यात ते म्हणतात, ” पंड्याने मुंबई इंडियन्सचे ग्लोव्ज घातले आहे. धोनी पुन्हा चेपॉक मैदानावर आला आहे. दोघेही भारताकडून खेळताय. विविधतेत एकता आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा ट्विट:
Pandya wearing @mipaltan gloves. Dhoni back in Chepauk. Both playing for @BCCI. Unity in diversity. @IPL for the win. ?
#INDvAUS
Pandya wearing @mipaltan gloves. Dhoni back in Chepauk. Both playing for @BCCI. Unity in diversity. @IPL for the win. 🦁#INDvAUS
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 17, 2017