---Advertisement---

हार्दिक पंड्याने हिटमॅनला दिला अ‍ॅव्हेंजर्समध्ये सामील होण्याचा सल्ला

On: शनिवार, एप्रिल 27, 2019 8:31 PM
---Advertisement---

चेन्नई। शुक्रवारी(26 एप्रिल) आयपीएल 2019 मध्ये 44 वा सामना एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. या सामन्यात मुंबईने 46 धावांनी विजय मिळवला. मुंबईच्या या विजयात कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला.

त्याने या सामन्यात 48 चेंडूत 67 धावा केल्या. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. रोहितचे हे या आयपीएल मोसमातील पहिलेच अर्धशतक होते. तसेच त्याला त्याच्या या अर्धशतकी खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने ट्विट करत रोहितचे कौतुक केले आहे. त्याने या ट्विटमध्ये रोहितला अ‍ॅव्हेंजर्समध्ये सामील होण्याबद्दल सुचवले आहे. अ‍ॅव्हेंजर्स सिरिजचा शेवटचा भाग असलेला अ‍ॅव्हेंजर्स: एन्डगेम हा चित्रपट शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला असून बुहुप्रतिक्षीत असलेल्या या चित्रपटाला जगभरातून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

सर्वत्र या चित्रपटाची चर्चा असल्याने हार्दिकनेही रोहितसाठी ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘हिटमॅनसाठी अ‍ॅव्हेंजर्समध्ये सामील होण्याची वेळ आली आहे. चेन्नईमध्ये जबरदस्त विजय’

या सामन्याला चेन्नईचा नियमित कर्णधार एमएस धोनी ताप आल्याने मुकला होता. त्याच्या अनुुपस्थितीत सुरेश रैनाने चेन्नईचे नेतृत्व केले होते.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना रोहितच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकात 4 बाद 155 धावा केल्या होत्या. त्यानंतर 156 धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सचा डाव 17.4 षटकातच 109 धावांवर संपुष्टात आला.

गोलंदाजीत मुंबईकडून लसिथ मलिंगाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर कुणाल पंड्या आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 2, तर हार्दिक पंड्या आणि अनुकुल रॉयने प्रत्येकी 1 विकेट घेतली. चेन्नईकडून मिशेल सँटेनरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच इम्रान ताहिर आणि दिपक चहरने प्रत्येकी एक विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

इंग्लंडला परतण्यापूर्वी बेन स्टोक्सचा राजस्थान रॉयल्सला भावनिक गुडबाय, पहा व्हिडिओ

२०१९ विश्वचषकासाठी १६ पंचांची आयसीसीने केली घोषणा, फक्त एका भारतीय पंचाचा समावेश

या चार क्रिकेटपटूंची बीसीसीआयने केली अर्जून पुरस्करासाठी शिफारस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment