यंदाच्या आयपीएल २०२२मधील सर्वात रोमांचक सामना म्हणून कदाचित गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबादमधील सामन्याचे नाव अव्वलस्थानी घेतले जाईल. कारण, बुधवारी (दि. २७ एप्रिल) मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी शेवटच्या षटकात प्रत्येकी २५ धावा चोपल्या. मात्र, विजय मिळाला तो हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स संघाला. या सामन्यात हैदराबादला नजीकचा पराभव पत्करावा लागला. यादरम्यान जसा गुजरातचा फलंदाज राशिद खानने विजयी षटकार खेचला, तसा स्टेडिअममध्ये उपस्थित असलेली पंड्याची पत्नी नताशा स्टॅन्कोविकने आपली जागा सोडत एकच जल्लोश केला. दुसरीकडे पंड्याही डगआऊटमध्ये बसून हसताना दिसला.
झाले असे की, गुजरातला विजयासाठी ६ चेंडूत २२ धावांची आवश्यकता होती. आव्हान नक्कीच कठीण होते. मात्र, गुजरातच्या फलंदाजांसाठी अशक्य नव्हते. यावेळी जसा राशिद खानने विजयी षटकार मारला, तसा हार्दिक पंड्याची (Hardik Pandya) पत्नी नताशा स्टॅन्कोविक (Natasa Stankovic) भलतीच खुश होत उड्या मारू लागली. तिचा जल्लोश करतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
WHAT. A. GAME! 👌👌
WHAT. A. FINISH! 👍👍
We witnessed an absolute thriller at the Wankhede and it's the @gujarat_titans who edged out #SRH to seal a last-ball win! 🙌 🙌
Scorecard ▶️ https://t.co/r0x3cGZLvS #TATAIPL #GTvSRH pic.twitter.com/jCvKNtWN38
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2022
यावेळी हैदराबादकडून २०वे षटक मार्को यान्सेन (Marco Jansen) टाकत होता. शेवटच्या षटकात २२ धावांची आवश्यकता असताना गुजरातकडून राहुल तेवतिया (Rahul Tewatia) आणि राशिद खान (Rashid Khan) मैदानावर उपस्थित होते. यावेळी स्ट्राईकवर असलेल्या तेवतियाने खणखणीत षटकार खेचला. यानंतर यान्सेनही चांगलाच दबावात आला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर एक धाव घेत त्याने स्ट्राईक राशिद खानला दिली. यावेळी गुजरातला विजयासाठी ४ चेंडूत १५ धावांची आवश्यकता होती. राशिदने तिसऱ्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचला. त्यानंतर चौथा चेंडू निर्धाव गेला. आता २ चेंडूत ९ धावांची आवश्यकता होती. अशात राशिदने पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर जोरदार षटकार मारला आणि संघाला ५ विकेट्सने विजय मिळवून दिला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
या विजयानंतर गुजरात टॉपला
हैदराबादविरुद्धच्या विजयानंतर गुजरात संघाने गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वलस्थान पटकावले आहे. दुसरीकडे, हैदराबाद संघ गुणतालिकेत १० क्रमांकासह तिसऱ्या स्थानी आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
Video: आयपीएलमध्ये प्रथमच फलंदाजी करत असलेल्या शशांकची घातक बॉलर फर्ग्युसनविरुद्ध षटकारांची हॅट्रिक
बिग ब्रेकिंग! इंग्लंडला मिळाला रुटचा वारसदार; बेन स्टोक्स बनला नवा कसोटी कर्णधार
दिल्लीचा सामना पाहून चिडलेला पाँटिंग, ३-४ रिमोटही तोडले होते, स्वत:च केलाय खुलासा