जागतिक क्रिकेटची सर्वात आवडती टी20 लीग, इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामाची क्रिकेटरसिक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यापूर्वी संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आयपीएल 2025 ची रिटेंशन यादी येताच मुंबई इंडियन्सने पुढील वर्षासाठी त्यांच्या कर्णधाराची घोषणा केली आहे, ज्यामध्ये पुन्हा एकदा मुंबईची कमान स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडे असणार आहे.
मुंबई इंडियन्सने आगामी हंगामासाठी त्यांच्या कर्णधाराची घोषणा करून सर्व चर्चांवर पूर्णविराम लावला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या कर्णधारपदाबाबत सातत्याने विविध बातम्या येत होत्या. दरम्यान, रिटेंशन यादी समोर येताच मुंबईने पुन्हा एकदा कर्णधारपदासाठी हार्दिक पांड्याचं नाव निश्चित केले आहे. कर्णधार म्हणून मागील हंगाम हार्दिक पांड्यासाठी खूप वाईट होता, परंतु फ्रँचायझीने पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास दाखवला आहे.
मुंबईने आपल्या कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये सर्व मोठ्या खेळाडूंना प्राधान्य दिले आहे. ज्यामध्ये हार्दिक पांड्याशिवाय त्याने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 5 वेळच्या चॅम्पियन मुंबईने जसप्रीत बुमराहला सर्वाधिक रक्कम दिली आणि त्याला 18 कोटी रुपये देत संघात कायम ठेवले. तर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी 16.35-16.35 कोटी रुपये, माजी कर्णधार रोहित शर्माला 16.30 कोटी रुपये दिले आहेत. तिलक वर्माला 8 कोटी रुपयांना कायम ठेवण्यात आले आहे.
मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा हार्दिकवर विश्वास व्यक्त केला
मुंबईच्या आयपीएल 2024 मधील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर मागचा हंगाम त्यांच्यासाठी खूपच खराब होता. या संघाला गेल्या वर्षी गुणतालिकेत तळाच्या स्थानावर राहावे लागले होते. त्यांनी 14 पैकी फक्त 4 सामने जिंकले, तर मुंबईला 10 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. तेव्हापासून हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित झाले होते. या स्टार खेळाडूवर सोशल मीडियावर सातत्याने निशाणा साधला जात होता, मात्र फ्रँचायझीने हार्दिकवर विश्वास ठेवत त्याच्याकडे पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे.
हेही वाचा –
कधीकाळी सर्वाधिक फी घेणाऱ्या धोनीला सीएसकेने फक्त ‘इतक्या’ कोटींना केले रिटेन
कर्णधार फाफची सुट्टी, तर कोहलीला मोठ्या किंमतीत केलं रिटेन; आरसीबीच्या मनात नेमकं काय?
आयपीएल 2025 साठी सर्व संघांनी कोणकोणत्या खेळाडूंना रिटेन केलं? रोहित-विराटचं काय झालं? संपूर्ण लिस्ट येथे वाचा