चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2025 साठी रिटेन केलेल्या खेळाडूंचे यादी जाहीर केली आहे. फ्रँचायझीने एकूण पाच खेळाडूंवर विश्वास व्यक्त केला. चेन्नईकडून कायम ठेवण्यात आलेल्या पाच खेळाडूंमध्ये माजी कर्णधार एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड, मथिशा पथिराना, शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे.
चेन्नईच्या रिटेन खेळाडूंची यादी पाहता चाहत्यांना सर्वात मोठा दिलासा एमएस धोनीच्या रूपाने मिळणार आहे. गेल्या हंगामापासून तो पुढच्या हंगामात खेळणार नसल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, तसे झाले नाही आणि धोनीने आयपीएलचा पुढील हंगाम खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र, लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे चेन्नईने धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवले. ज्यामुळे धोनीला फक्त 4 कोटी रुपये मिळाले.
आयपीएलमधील नियमांबद्दल मोठी चर्चा झाली की, पाच किंवा त्याहून अधिक वर्षे निवृत्त झालेल्या भारतीय खेळाडूंना अनकॅप्ड म्हणून कायम ठेवता येईल. चेन्नईने धोनीच्या त्या नियमाचा फायदा घेतला आणि त्याला अनकॅप्ड म्हणून कायम ठेवले. चेन्नईने पाच खेळाडूंवर एकूण 65 कोटी रुपये खर्च केले. संघाने ऋतुराज गायकवाड आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी 18 कोटी रुपयांच्या सर्वोच्च किंमतीत कायम ठेवले. याशिवाय मथिशा पाथिरानाला 13 कोटी आणि शिवम दुबेला 12 कोटींना कायम ठेवण्यात आले आहे. हा संघ 55 कोटी रुपयांसह आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात प्रवेश करेल. आता मेगा लिलावात चेन्नई कोणत्या खेळाडूंवर बोली लावते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आता संघाला मेगा लिलावात फक्त एकाच खेळाडूसाठी राईट टू मॅच वापरता येणार आहे.
आता चेन्नई मेगा लिलावात रचिन रविंद्र व डेवॉन कॉनवे यांच्यापैकी एकावर राईट टू मॅच कार्ड वापरू शकते. याशिवाय शेख राशिद, राजवर्धन हंगरगेकर व तुषार देशपांडे यांच्या नावाचा देखील विचार होऊ शकतो.
हेही वाचा –
कर्णधार फाफची सुट्टी, तर कोहलीला मोठ्या किंमतीत केलं रिटेन; आरसीबीच्या मनात नेमकं काय?
आयपीएल 2025 साठी सर्व संघांनी कोणकोणत्या खेळाडूंना रिटेन केलं? रोहित-विराटचं काय झालं? संपूर्ण लिस्ट येथे वाचा
पंत-राहुलवर इतक्या कोटी रुपयांची बोली लागेल! आकाश चोप्रांनी आकडा सांगितला