2025च्या आयपीएल (IPL) हंगामापूर्वी सर्व संघांनी भारतीय नियामक मंडळाने (BCCI) दिलेल्या नव्या नियमांनुसार रिटेंन्शन यादी जाहीर केली आहे. आता चाहत्यांनी नक्कीच आगामी मेगा लिलावाची उत्सुकता लागली असेल. जो नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी होणार आहे. मुंबईने हार्दिक पांड्यासह (Hardik Pandya) प्रमुख 5 खेळाडूंना कायम ठेवले आहे. मात्र, हार्दिक पांड्या आयपीएल 2025चा पहिला सामना खेळू शकणार नाही.
वास्तविक, हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. आयपीएल 2024च्या शेवटच्या साखळी सामन्यात हार्दिक पांड्याने मोठी चूक केली. हार्दिकच्या मुंबई इंडियन्सला 20 षटके वेळेवर पूर्ण करता आली नाहीत, त्यानंतर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने 30 लाख रुपयांचा दंड आणि नियमानुसार हार्दिक पांड्यावर एका सामन्याची बंदी घातली. या कारणामुळे हार्दिक आयपीएल 2025चा पहिला सामना खेळू शकणार नाही.
यंदा आयपीएल 2025चा मेगा लिलाव (Mega Auction) सौदी अरेबियातील जेद्दा शहरात होणार आहे. 24 ते 25 नोव्हेंबर रोजी मेगा लिलाव होणार आहे. लिलावासाठी 1,500 हून अधिक खेळाडूंनी नोंदणी केली आहे. मात्र, सध्या सर्व संघ लिलावासाठी खेळाडूंची नावे निवडतील. या लिलावात फक्त शॉर्टलिस्टेड खेळाडूच सहभागी होतील. या हंगामात जास्तीत जास्त 204 खेळाडू विकले जाऊ शकतात.
आयपीएल 2025 साठी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) रिटेन केलेले खेळाडू-
1) जसप्रीत बुमराह (18 कोटी)
2) सूर्यकुमार यादव (16.35 कोटी)
3) हार्दिक पंड्या (16.35 कोटी)
4) रोहित शर्मा (16.30 कोटी)
5) तिलक वर्मा (8 कोटी)
महत्त्वाच्या बातम्या-
भारताशिवाय चॅम्पियन्स ट्राॅफी खेळली जाऊ शकते, माजी कर्णधाराचे मोठे वक्तव्य!
IPL 2025; अक्षर पटेल होणार दिल्लीचा नवा कर्णधार? मेगा लिलावापूर्वीच मोठा खुलासा
Border Gavaskar Trophy; रिषभ पंतला घाबरतो कांगारू संघ?