---Advertisement---

हार्दिक पांड्या चेन्नईत आल्यास संघाला ‘या’ 3 बाबतीत होणार फायदा! ट्रेडवर मुंबईची भूमिका काय?

On: शनिवार, ऑगस्ट 1, 2026 10:57 PM
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आतापासूनच आयपीएल 2027 ची तयारी सुरू केली असून, यासाठी त्यांनी काही खेळाडूंना ट्रेड म्हणजे आपसात अदलाबदल करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. फ्रँचायझी मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) हार्दिक पंड्याला आपल्या संघात घेण्यासाठी प्रयत्न करत आहे.

जर हार्दिक आयपीएल 2027 पूर्वी चेन्नई संघात सामील झाला, तर सीएसकेच्या 3 सर्वात मोठ्या अडचणी अगदी सहजरीत्या दूर होऊ शकतात. यामुळे त्यांच्याकडे सहावे ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी असेल.

जर हार्दिक पंड्याला (Hardik pandya) ट्रेड करण्याच्या या डीलमध्ये सीएसकेला यश मिळाले, तर संघापुढील मोठे प्रश्न सुटतील. गेल्या तिन्ही हंगामांत ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) नेतृत्वावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. अशा वेळी हार्दिक पंड्या आल्यास कर्णधारपदाचा प्रश्न मार्गी लागेल. गुजरात टायटन्सला जसे त्याने यश मिळवून दिले, तसेच तो चेन्नईसाठी ती कामगिरी करू शकतो. मुंबई इंडियन्समध्ये वादांमुळे पांड्या खूप दबावाखाली दिसत होता.

शिवम दुबे (Shivam Dube) गोलंदाजीत फारसं योगदान देत नाही. मात्र, त्याच्या जागी हार्दिक पंड्या संघात आल्यास तो गोलंदाजीत पूर्ण 4 षटके टाकू शकतो. तसेच, चांगला मॅच फिनिशर शोधण्यासाठी धडपडणाऱ्या सीएसकेसाठी (CSK) हार्दिक पंड्या हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---