हार्दिक पंड्या हा सध्याचा जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानला जातो. तो त्याच्या स्फोटक फलंदाजीबरोबरच चांगल्या गोलंदाजीसाठीही ओळखला जातो. तो प्रकाशझोतात येण्यासाठी आयपीएल हे त्याच्या कारकिर्दीतील मोठे व्यासपीठ ठरले होते. विशेष आयपीएलमध्ये पदार्पण केल्यानंतर 2 वर्षात त्याची क्रिकेट कारकीर्द जवळजवळ संपुष्टात आली होती, परंतु आपल्या चमकदार कामगिरीने त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.
आयपीएल 2015 मध्ये झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्स संघाने हार्दिक पंड्याला दहा लाख रूपयांत विकत घेतले होते. साल 2015 चे आयपीएल सत्र त्याच्यासाठी चांगले गेले. त्यामध्ये त्याने 9 सामन्यात 184.56 च्या शानदार स्ट्राईक रेटने एकूण 112 धावा केल्या. या मोसमात त्याने सर्वाधिक 61 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली होती.
तसेच आयपीएल 2016 पूर्वी खेळल्या गेलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी या स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. या स्पर्धेत त्याने बडोदा संघासाठी एकूण 10 सामने खेळताना 53.86 च्या जबरदस्त सरासरीने आणि 130.90 च्या स्ट्राइक रेटने एकूण 377 धावा केल्या. नितीश राणा नंतर या स्पर्धेत सर्वाधिक 19 षटकार लावण्याचा मान त्याने पटकवला होता. तसेच त्याने भारताकडून त्यावर्षी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पणही केले होते.
परंतु, आयपीएल 2016 मध्ये तो सपशेल अपयशी ठरला. त्याची खेळण्याची क्षमता पाहून मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने त्याला तीन नंबरवरती फलंदाजी करण्याची संधी दिली, परंतु तो या संधीच सोने करू शकला नाही. या आयपीएल सत्रात त्याने मुंबई इंडियन्सकडून 11 सामने खेळले आणि त्यामध्ये तो 6.28 च्या माफक सरासरीने ते केवळ 44 धावा करु शकला. तसेच गोलंदाजीतही त्याची कामगिरीही अत्यंत खराब राहिली होती. त्याने 9.18 च्या इकॉनॉमी रेटने एकूण 3 गडी बाद केले.
परंतु 2016 च्या आयपीएलनंतर भारताने अमेरिकेमध्ये वेस्ट इंडीजसोबत 2 सामन्यांची टी 20 मालिका खेळली होती. या टी20 मालिकेच्या पहिल्या सामन्यात अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीच्या 5 चेंडूवर एविन लुईस सलग 5 षटकार ठोकल्याने स्टुअर्ट बिन्नीची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आणली.
अशा परिस्थितीत न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या मायदेशातील एकदिवसीय मालिकेसाठी अष्टपैलू वेगवान गोलंदाज म्हणून भारतीय निवडकर्त्यांकडे कोणता पर्याय राहिला नव्हता. त्यामुळे निवडकर्त्यांनी आयपीएल 2016 मधील हार्दिकचे अपयश विसरून आणि त्याच्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या कामगिरीला प्राधान्य देत न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याला संघात स्थान देण्यात आले.
विशेष म्हणजे त्यानेही या संधीचे सोने करत त्याच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात त्याने ‘सामनावीर’ होण्याचा मान पटकवला. त्यानंतर त्याने आपल्या कामगिरीमध्ये सातत्य ठेवले.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१: पडीक्कलच्या अनुपस्थितीत ‘या’ खेळाडूला मिळू शकते आरसीबी संघाकडून पदार्पणाची संधी
आयपीएल २०२१: दिल्ली कॅपिटल्सला धक्का, ‘हे’ दोन प्रमुख खेळाडू सीएसकेविरुद्धच्या सामन्याला मुकणार






