भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. रविवारी (19 नोव्हेंबर) भारतीय संघाने आपला फॉर्म कायम ठेवून विश्वचषक जिंकावा, यासाठी सर्वजण शुभेच्छा देत आहेत. विश्वचषक हंगामातील 10पैकी 10 सामन्यांमध्ये रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील संघाने विजय मिळवला आहे. पण यातील शेवटच्या सहा सामन्यांमध्ये अष्टपैलू हार्दिक पंड्या संघातून बाहेर होता. अंतिम सामन्यापूर्वी हार्दिकने आपल्या सहकाऱ्यांसाठी खास संदेश पाठवला आहे.
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) वनडे विश्वचषक 2023च्या दृष्टीने भारतीय संघाचा महत्वाचा खेळाडू होता. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये योगदान देत असल्यामुळे त्याचे प्लेइंग इलेव्हनमधील स्थान पक्के होते. पण विश्वचषकातील पहिल्या चार सामन्यांमध्येच हार्दिक खेळू शकला. यातील फक्त एका सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली आणि तो 11* धावा करू शकला. गोलंदाजाच्या रुपात हार्दिकने चार सामन्यात 5 विकेट्स घेतल्या. असे असले तरी, 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध खेळताना त्याला दुखापत झाली, ज्यामुळे तो संपूर्ण विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला.
हार्दिकने अद्याप फिटनेस मिळवली नाहीये. याच कारणास्तव आगामी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकांमधूनही त्याला माघार घ्यावी लागली. विश्वचषकाचाच्या अंतिम सामनाही त्याच्या अनुपस्थितीत खेळला जात आहे. पण अंतिम सामन्यासाठी त्याने संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर शेअर केलेल्या व्हिडिओत हार्दिक म्हणतो, “आपल्याला या संघाचा खूप अभिमान वाटत आहे. संघाने विश्वचषकात आतापर्यंत केलेली कामगिरी मागच्या अनेक वर्षांमधील मेहनतीचे फळ आहे. आपण त्या गौरवापासून (विश्वचषक जिंकण्यापासून) आणि लहानपणी पाहिलेल्या स्वप्नापासून फक्त एक पाऊल दूर आहोत. विश्वचषक ट्रॉफी फक्त आपल्यासाठी नाही, तर आपल्यामागे असणाऱ्या अब्जावधी लोकांसाठी उंचवायची आहे. माझे प्रेम नेहमी तुमच्या सोबत असेल. आता फक्त ट्रॉफी घरी आणा, जय हिंद!”
????????❤️ pic.twitter.com/wvo9c5MUpn
— hardik pandya (@hardikpandya7) November 18, 2023
दरम्यान, विश्वचषक स्पर्धेत हार्दिकच्या अनुपस्थितीमध्येही भारतीय संघ भक्कम आहे. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह अशी भेदक वेगवान गोलंदाजांची फळी संघाकडे आहे. तसेच फलंदाजी क्रमात विराट कोहली, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यरसह स्वतः कर्णधार रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. असे असले तरी, चाहत्यांना चिंता वाटत आहे ती हार्दिक पंड्या याची. मागच्या वेळी हार्दिक जवळपास दोन वर्ष दुखापतीमुळे राष्ट्रीय संघातून बाहेर बसला होता. यावेळी तो वेलेत दुखापतीतून सावरणार की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (Hardik Pandya’s special message to Team India, who was out of the World Cup due to injury)
महत्वाच्या बातम्या –
World Cup Final 2023: भारतीय फॅन्सना शांत करण्यातच खरी मजा, ॲास्ट्रेलियन कर्णधाराचे खोडसाळ विधान
World Cup Final: भारताचा प्रमुख गोलंदाज फायनलमधून बाहेर? अश्विनचे फायनल खेळण्याचे वाढले चान्सेस