कॅनबेरा। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना बुधवारी (२ डिसेंबर) मनुका ओव्हल येथे झाला. हा सामना भारताने १३ धावांनी जिंकला. या सामन्यात भारतीय संघाचे धडाकेबाज खेळाडू हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांनी जबरदस्त खेळी केली. त्यांच्या खेळीने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल प्रभावित झाला आणि त्याने मोठी प्रतिक्रिया दिली.
पंड्या (नाबाद ९२ धावा) आणि जडेजाने (नाबाद ६६) १५० धावांची भलीमोठी भागीदारी रचली. त्यांनी ३२ व्या षटकात फलंदाजीला येत सहाव्या विकेटसाठी १५० धावांची भागिदारी नाबाद भागीदारी रचत सामना पालटून टाकला. एकेवेळी असे वाटत होते की, भारतीय संघ २५० धावांच्या आतच संपुष्टात येईल, परंतु जडेजा आणि पंड्याने भारताला ३०० धावांचा टप्पा पार करण्यात मोलाचे योगदान दिले.
पंड्या आणि जडेजाच्या भागीदारीने सामना भारताच्या बाजूने गेला का?, असे विचारले असता मॅक्सवेल म्हणाला की, “हो, नक्कीच. मला वाटते की खेळपट्टी ज्याप्रकारची होती. आम्ही १५० धावांवर पाच विकेट्स घेतल्या होत्या आणि गोलंदाजी लाईन-अपमधील फलंदाज खेळायला येण्यात केवळ १ विकेट दूर होतो. त्यामुळे आम्हाला माहिती होते की आम्ही एक विकेट दूर होते.”
सामना घेतला हिसकावून
त्याने व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत म्हटले की, “दुर्देवाने ते ज्याप्रकारे खेळले, त्यांनी दबाव बनवला. त्यांनी (पंड्या आणि जडेजा) शानदार खेळी केली आणि जबरदस्त शॉट लावून सामना आमच्याकडून हिसकावून घेतला.”
या सामन्यात मॅक्सवेलने ३८ चेंडूत ५९ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याने या धावा करताना ३ चौकार आणि ४ षटकारही ठोकले होते. याव्यतिरिक्त भारताकडून गोलंदाजी करताना शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराहने मॅक्सवेलची महत्त्वपूर्ण विकेट घेत सामना भारताच्या बाजून वळवला. बुमराहनेही २ विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला. ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांची वनडे मालिका २-१ ने जिंकली.
पुढील ३ सामन्यांची टी२० मालिका शुक्रवारपासून (४ डिसेंबर) होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘स्विच हिटवर बंदी आणा’, माजी ऑस्ट्रेलियन कर्णधाराची आयसीसीकडे संतप्त मागणी
१५ वर्षांच्या टी२० क्रिकेट इतिहासात कोणालाही न करता आलेला पराक्रम डेविड मलानने केलाय
…म्हणून मिशेल स्टार्क भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेत खेळला नाही, फिंचने केला खुलासा
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारे ५ संघ; टीम इंडिया आहे ‘या’ स्थानावर
भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर
‘हीच’ ती ३ तीन कारणे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसर्या वनडेत भारताकडून पत्करावा लागला पराभव