---Advertisement---

बहुत पुराना याराना! सुट्टी मिळताच हार्दिक पोहोचला पोलार्डच्या घरी पाहुणचार घ्यायला

On: गुरूवार, ऑगस्ट 4, 2022 9:25 PM
---Advertisement---

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा आणि पाचवा सामना अमेरिकेतील फ्लोरिडा येथे होणार आहे. हे दोन्ही सामने ६ आणि ७ ऑगस्ट रोजी खेळले जातील. वेस्ट इंडीज संघ आणि भारतीय संघाचे काही सदस्य फ्लोरिडाला पोहोचले आहेत. अमेरिकेचा व्हिसा मिळाल्यानंतर इतर खेळाडू तेथे पोहचतील. तिसऱ्या सामन्यानंतर खेळाडूंना त्यांच्या मित्रांना भेटण्यासाठी वेळ मिळाला आहे. कारण चौथा सामना चार दिवसांनी खेळवला जाणार आहे.

दोन सामन्यांमधील अंतरामुळे भारतीय खेळाडूंना क्रिकेटच्या मैदानापासून थोडे दूर जाण्याची संधीही मिळाली. दरम्यान, संघाचा उपकर्णधार व अष्टपैलू हार्दिक पंड्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार कायरन पोलार्ड आणि त्याचे कुटुंबीय दिसत आहे.

हार्दिकने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने शेअर केलेल्या दोन छायाचित्रांमध्ये पोलार्ड व त्याचे कुटुंबीय दिसतेय. या पोस्टला कॅप्शन देताना त्याने लिहिले,

https://www.instagram.com/p/Cg1fD_GKeNi/?igshid=YmMyMTA2M2Y=

‘कॅरेबियन देशांतील सहल किंगला भेटल्याशिवाय पूर्ण होणार नाही. पॉली आणि त्याच्या कुटुंबाचे माझे आदरातिथ्य केल्याबद्दल धन्यवाद.’

पोलार्ड व हार्दिक २०१५ ते २०२१ असे सात वर्ष मुंबई इंडियन्ससाठी एकत्र खेळले होते. ते दोघे एकमेकांचे जिवाभावाचे मित्र म्हणून ओळखले जातात.

जबरदस्त फॉर्ममध्ये आहे हार्दिक

हार्दिक मागील काही काळापासून शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने आयपीएल विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर त्याला भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. तसेच तो फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात चांगले योगदान देत आहे. याच कारणाने त्याला भारतीय टी२० संघाचा नियमित उपकर्णधार करण्यात येणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

‘केएल राहुलसाठी सोपे नसेल पुनरागमन!’, माजी दिग्गजाने उपस्थित केले प्रश्न

टीम इंडियात होणार नेतृत्वबदल? हार्दिकच्या खांद्यावर येणार मोठी जबाबदारी

सूर्यकुमारवरून आपापसांत भिडले २ भारतीय दिग्गज; श्रीकांत कैफला म्हणाले, तू असं केलं असता का?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---