आयपीएल 2024 मध्ये चौथा सामना हा मुंबई इंडियन्सचा सामना हा गत उपविजेता संघ गुजरात टायटन्स याच्यात होणार आहे. तसेच या सामन्यात दोन्ही संघाचे नवीन कर्णधार असणार आहेत. तसेच या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. यासोबतच पांड्या मुंबई संघाचे नेतृत्त्व करतानाही दिसणार आहे. तर गुजरात टायटन्सची धुरा शुभमन गिलच्या खांद्यावर असणार आहे.
याबरोबरच पहिल्याच सामन्यात विजय मिळवत मोहिमेची सुरूवात विजयाने करण्यावर दोन्ही संघाचे लक्ष असणार आहे. तसेच हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. तर या सामन्याला भारतीय वेळेनुसार 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे. तर हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर तर मोबाईलवर जिओ सिनेमा वरती पहाता येणार आहे.
आयपीएलच्या इतिहासात मुंबई विरुद्ध गुजरात दोन्ही संघ एकूण 4 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये दोन्हा संघांमध्ये बरोबरीची लढाई राहिली आहे. मुंबई आणि गुजरात दोघांनी प्रत्येकी 2-2 सामने जिंकले आहेत. तसेच गुजरातने या स्टेडियममध्ये खेळलेल्या 10 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 4 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. तसेच मुंबईची या मैदानातील आकडेवारी चिंताजनक आहे. मुंबईला या स्टेडियममध्ये खेळलेल्या 4 पैकी फक्त एका सामन्यातच विजय मिळवता आला आहे. तर 3 वेळा प्रतिस्पर्धी संघांकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.
गुजरात टायटन्स टीम : शुबमन गिल (कॅप्टन), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, उमेश यादव, नूर अहमद, केन विल्यमसन, मॅथ्यू वेड, जयंत यादव, संदीप वॉरियर, शाहरुख खान, अभिनव मनोहर, शरथ बीआर, आर साई किशोर, दर्शन नळकांडे, कार्तिक त्यागी, स्पेन्सर जॉन्सन, अजमतुल्ला उमरझाई आणि सुशांत मिश्रा.
मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पांड्या (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, ल्यूक वुड, सूर्यकुमार यादव, श्रेयस गोपाल, विष्णू विनोद, शम्स मुलानी, रोमारियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, आकाश मधवाल, नुवान तुषारा, देवाल्ड ब्रेविस, क्वेना मफाका आणि नमन धीर.
महत्त्वाच्या बातम्या-