आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा पहिला सुपर संडे आणि दोन सामन्यांचा थराराचा पहिला मिळणार आहे. आयपीएल 2024 चा पाचवा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. तसेच दोन्ही संघ आपल्या नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात खेळण्यासाठी सज्ज आहेत. मात्र त्याआधी हार्दिकसमोर पहिल्याच सामन्यात मोठं आव्हान असून हार्दिकसमोर मुंबईसाठी गेल्या 11 वर्षांपासून सुरु असलेली परंपरा मोडीत काढण्याचं मोठं आव्हान सध्या निर्माण झाले आहे.
याबरोबरच, मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या हंगामात आपला पहिला सामना हा 2012 साली जिंकला होता. त्यानंतर 2013 ते 2023 पर्यंत मुंबईला एकदाही आयपीएलमधील आपला पहिला सामना जिंकता आलेला नाही. तर रोहित शर्मा याने 2013 पासून मुंबईचं नेतृत्व केलं आहे. रोहितने 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली. मात्र रोहितला सुरुवातीचा सामना जिंकून देण्यात काय यश आलं नाही. त्यामुळे हार्दिकसमोर मुंबईला गुजरातवर मात करुन विजयी सुरुवात करुन देण्याचं मोठं आव्हान निर्माण झाले आहे.
अशातच गुजरात विरुद्ध मुंबई आयपीएलमध्ये 4 वेळा आमने-सामने आले असून दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध जबरदस्त टक्कर दिली आहे. तसेच यामध्ये मुंबईने 2 सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे गुजरातनेही मुंबईला तितक्याच सामन्यात पराभूत केलं आहे. त्यामुळे या हंगामात दोन्ही संघांचा सलामीचा सामना हा अत्यंत चुरशीचा होणार हे मात्र नक्की आहे.
गुजरात टायटन्स टीम : शुबमन गिल (कॅप्टन), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, उमेश यादव, नूर अहमद, केन विल्यमसन, मॅथ्यू वेड, जयंत यादव, संदीप वॉरियर, शाहरुख खान, अभिनव मनोहर, शरथ बीआर, आर साई किशोर, दर्शन नळकांडे, कार्तिक त्यागी, स्पेन्सर जॉन्सन, अजमतुल्ला उमरझाई आणि सुशांत मिश्रा.
मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पांड्या (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, ल्यूक वुड, सूर्यकुमार यादव, श्रेयस गोपाल, विष्णू विनोद, शम्स मुलानी, रोमारियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, आकाश मधवाल, नुवान तुषारा, देवाल्ड ब्रेविस, क्वेना मफाका आणि नमन धीर.
महत्त्वाच्या बातम्या-