IPLक्रिकेटटॉप बातम्या

कर्णधार संजू सॅमसनचे धमाकेदार अर्धशतक,अन् हंगामातील पहिला सामना जिंकण्यासाठी लखनऊपुढे 194 धावांचे आव्हान

आयपीएलच्या 17 व्या हंगामात आज पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचा संघ आमने-सामने आला आहे. तसेच हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. तर या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकला असून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानंतर राजस्थान रॉयल्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 193 धावा केल्या आहेत. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने धमाकेदार फलंदाजी केली आहे. तसेच त्याने या सामन्यात 52 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी केली असून  त्याने 3 चौकार आणि 6 षटकार मारले आहेत. तर खनऊ सुपर जायंट्सकडून नवीन-उल-हकने 4 षटकात 41 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. तर मोहसिन खान आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.

दरम्यान या सामान्यात राजस्थान रॉयल्सकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला उतरलेल्या रियान परागचं अर्धशतक थोडक्यात हुकलं आहे. तसेच त्याने राजस्थानसाठी कर्णधार संजू सॅमसनबरोबर 93 धावांची भागीदारी देखील केली आहे.

दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन-

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन –केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, कृणाल पांड्या, रवी बिश्नोई, मोहसीन खान, नवीन-उल-हक, यश ठाकूर.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन –यशस्वी जैस्वाल, जॉस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, संदीप शर्मा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल.

महत्त्वाच्या बातम्या-

Related Articles