आशिया चषक 2023 स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाच्या वरच्या फलंदाजी फळीने अत्यंत निराश केले. भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय पाकिस्तानी गोलंदाजांनी प्राथमिकरीत्या सपशेल चुकीचा ठरवला. आधी रोहित, नंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्यापाठोपाठ शुबमन गिल हादेखील धावांपेक्षा तिप्पट चेंडू खेळून तंबूत परतला. त्यामुळे भारताच्या खालच्या फलंदाजी फळीवरील दबाव वाढला.
शुबमन गिलची विकेट
युवा प्रतिभावान खेळाडू शुबमन गिल (Shubman Gill) याच्याकडून चाहत्यांसोबतच संघालाही भरपूर अपेक्षा होत्या. मात्र, तो या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला. पाकिस्तानविरुद्ध पहिलाच सामना खेळत असलेल्या गिलचा गोलंदाजांपुढे टिकाव लागला नाही. शुबमन या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासोबत सलामीला उतरला होता. मात्र, त्याने सुरुवातीपासूनच संथ गतीने फलंदाजी केली. या सामन्यात त्याने एकूण 32 चेंडूंचा सामना केला, पण त्याला फक्त 10 धावांवरच समाधान मानावे लागले.
https://twitter.com/BigggBoss17/status/1697939862719193586
भारताच्या डावातील 15वे षटक हॅरिस रौफ टाकत होता. रौफने ताशी 147 किमी गतीने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर गिलचा त्रिफळा उडवला. त्यामुळे हॅरिसच्या खात्यात दुसरी विकेट पडली. यावेळी भारताला शुबमनच्या रूपात 66 धावांवर चौथा धक्का बसला.
भारतीय वरची फळी ढासळली
कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने या सामन्यात चांगली सुरुवात केली होती. मात्र, नंतर त्याचा खेळ मंदावला. त्याने या सामन्यात एकूण 22 चेंडूंचा सामना केला, पण त्याला फक्त 11 धावाच करता आल्या. यामध्ये 2 चौकारांचाही समावेश होता. डावातील पाचवे षटक टाकत असलेल्या शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) याने रोहितला अखेरच्या षटकावर त्रिफळाचीत बाद केले.
रोहितनंतर आफ्रिदी सातवे षटक टाकण्यासाठी आला. यावेळी स्ट्राईकवर विराट कोहली (Virat Kohli) होता. आफ्रिदीने आपल्या तिसऱ्या चेंडूवर विराटलाही त्रिफळाचीत बाद केले. आफ्रिदीचा चेंडू खेळताना विराटच्या बॅटची कड घेत चेंडू थेट स्टम्पला जाऊन लागला. त्यामुळे आफ्रिदीच्या खात्यात 2 विकेट्सचा समावेश झाला. यानंतर भारताला तिसरा झटका श्रेयस अय्यर याच्या रूपात बसला. 10वे षटक टाकत असलेल्या रौफने अखेरच्या चेंडूवर अय्यरला इफ्तिखार अहमद याच्या हातून अय्यरला झेलबाद केले. (haris rauf bold shubman gill in asia cup 2023 ind vs pak match)
हेही वाचा-
सलामीवीर म्हणून कमी पडल्याचे रोहितने केले मान्य! आशिया चषकासाठी बदलणार खेळण्याची पद्धत
IND vs PAK: अश्विनने शेअर केला राष्ट्रगीताचा व्हिडिओ, कॅप्शन जिंकेल तुमचेही मन