भारत अ विरूद्ध पाकिस्तान अ संघ (India A vs Pakistan A) (18 ऑक्टोबर) पासून सुरू होणाऱ्या इमर्जिंग आशिया कप 2024 मध्ये आमने-सामने दिसणार आहेत. या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाचा कर्णधार मोहम्मद हारिसने (Mohammad Haris) मोठे वक्तव्य केले आहे. वास्तविक पाकिस्तान कर्णधार म्हणाला की, ड्रेसिंग रूममध्ये भारताबद्दल बोलण्यास बंदी आहे. ओमानमध्ये होणाऱ्या इमर्जिंग आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची धुरा स्टार खेळाडू तिलक वर्माकडे (Tilak Varma) सोपवण्यात आली आहे.
भारत-पाकिस्तानचे संघ त्यांच्या पहिल्या सामन्यातच आमने-सामने येणार आहेत. या स्पर्धेत 8 संघांचा समावेश आहे. संघांची 2 गटात विभागणी केली आहे. अ गटात अफगाणिस्तान अ, बांगलादेश अ, हाँगकाँग अ श्रीलंका अ यांचा समावेश आहे, तर गतविजेता पाकिस्तान अ, भारत अ, ओमान अ, यूएईसह गट ब मध्ये ठेवण्यात आले आहे. भारत विरूद्ध पाकिस्तान (19 ऑक्टोबर) रोजी भिडणार आहेत.
एका मुलाखतीत मोहम्मद हारिस (Mohammad Haris) म्हणाला, “मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. या ड्रेसिंग रूममध्ये भारताबद्दल बोलण्यास बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ आहे. तुम्हाला भारताचा विचार करण्याची गरज नाही. आम्हाला इतर संघांचाही विचार करावा लागेल. मी वरिष्ठ पाकिस्तान संघात होतो, शेवटचा विश्वचषकही खेळलो आहे. यामुळे इतका दबाव निर्माण होतो की मानसिकदृष्ट्या तुम्ही भारताचा विचार करत राहता.”
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2025; 15 चेंडूत अर्धशतक ठोकलेल्या ‘या’ स्टार खेळाडूवर दिल्ली खरचणार कोट्यवधी रूपये
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरीने धावा करणाऱ्या यादीत, भारताच्या युवा खेळाडूचा समावेश!
रोहित शर्मानंतर कोण होणार पुढील कर्णधार? हिटमॅननं स्वत: दिले संकेत