---Advertisement---

Video: फक्त एक स्टंप दिसत असतानाही गोलंदाजाने उडवल्या बेल्स; थ्रो पाहून सर्वजण हैराण

On: शुक्रवार, मे 27, 2022 5:02 PM
Haris-Rauf
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेटचा वेगवान गोलंदाज हारिस रऊफ सध्या टी-२० ब्लास्टमध्ये यॉर्कशायर संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात यॉर्कशायर संघाने वोस्टरशायरला ७ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात गोलंदाज रऊफने एका फलंदाजाला असे बाद केले, जे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. गॅरेथ होडरिक रऊफच्या चेंडूवर धावबाद झाला.

वेगवान गोलंदाज हारिस रऊफ (Haris Rauf) याने यॉर्कशायरसाठी या सामन्यात ४ षटके गोलंदाजी केली. यामध्ये त्याने ३२ धावा खर्च केल्या आणि १ विकेट घेतली. वोस्टरशायरचा फलंदाज गॅरेथ रोडरिक (Gareth Roderick) रऊफच्या चेंडूवर आणि त्याच्या हाताने धावबाद झाला. रऊफने मारलेला थ्रो पाहून फलंदाज रोडरिक तर हैराण झालाच, पण मैदानातील सर्व खेळाडूही आश्चर्यचकीत झाल्याचे पाहायला मिळाले.

झाले असे की, वोस्टरशायरचा फलंदाज गॅरेथ रोडरिक रऊफच्या एका शॉर्ट चेंडूवर पूल शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याला हा शॉट व्यवस्थित मारता आला नाही. चेंडू बॅटला लागून नॉन स्ट्राईक एंडवरील स्टंपला जाऊन लागला. अशात फलंदाजाकडे वेगाने एक धाव घेण्याची संधी तयार झाली. याच विचाराने रोडरिक एक धावा घेण्यासाठी धावला.

तसे पाहिले, तर फलंदाज या चेंडूवर एक धाव नक्कीच घेऊ शकत होते, पण गोलंदाज रऊफने त्याचा चपळाई दाखवल्यामुळे चित्र पूर्णपणे बदलले. फलंदाजाने मारलेला चेंडू रऊफने तत्काळ पकडला आणि नॉन स्ट्राईक एंडवरील स्टंपवर नेम धरून मारला. चेंडू स्टंपवर अचूक बसला आणि फलंदाजाला खेळपट्टी सोडावी लागली. रोडरिक धावबाद झाल्यानंतर स्वतः निराश दिसला. कारण ज्यावेळी तो धावला होता, तेव्हा त्याने विचारही केला नसेल की, त्याला या चेंडूवर विकेट गमवावी लागेल.

https://twitter.com/VitalityBlast/status/1529533535463297024?s=20&t=mZb8fpTTbd93I6CJUWMu2w

रऊफचा थ्रो खास यासाठी होता, की त्याने जेव्हा चेंडू पकडला, तेव्हा त्याला फक्त एक स्टंप दिसत होता. त्याने ज्या एंगलवरून हा थ्रो केला, त्यासाठी त्याचे अधिक कौतुक केले जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले गेले आहे की, “हे कमाल क्षेत्ररक्षण आहे, केवळ एक स्टंप दिसत असताना नेम लावला.” टी-२० ब्लास्टने त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

‘आर अश्विन राजस्थानसाठी समस्या आहे, कारण…’, माजी भारतीय दिग्गजाचे परखड मत

मला बघणं बंद कर आणि बॉल टाक; जेव्हा धोनीला पहिल्यांदा भेटला होता ‘हा’ भारतीय गोलंदाज, वाचा किस्सा

धक्कादायक! वृद्धिमान साहाने अर्ध्यातच सोडली संघाची साथ, व्हॉट्सऍप ग्रूपमधूनही गायब

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---