---Advertisement---

शतकवीर स्म्रीतीच्या ‘त्या’ दिलखेचक फोटोवर भारतीय खेळाडूही फिदा; म्हणाली, ‘ओ हसीना जुल्फो वाली’

On: शनिवार, ऑक्टोबर 2, 2021 5:34 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघांमध्ये ३० सप्टेंबरपासून दिवसरात्र कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. भारताची सलामी फलंदाज स्मृती मंधानाने या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी तिचे शतक पूर्ण केले आणि १२७ धावांची दमदार खेळी करून इतिहास रचला आहे. स्मृतीने हे शतक पूर्ण करताच अनेक विक्रम तिच्या नावावर केले आहेत. ती गुलाबी चेंडू कसोटीत शतक करणारी पहिली भारतीय महिला आणि क्रिकेटच्या इतिहासातील दुसरी खेळाडू ठरली आहे. विराट कोहलीने यापूर्वी २ वर्षांपूर्वी बांगलादेशविरुद्ध डे नाइट कसोटीत हा पराक्रम केला होता. दरम्यान, स्मृतीला शुभेच्छा देण्यासाठी हरलीन देओलने ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली आहे.

सध्या सुरू असलेल्या डे नाइट कसोटी सामन्यात हरलीन देओलचा सहभाग नाही. असे असले तरीही, स्मृतीच्या शतकाच्या आनंदात सहभागी होत हरलीनने तिच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून शुभेच्छा दिल्या आहेत. तिने तिचा शतक पूर्ण केल्यानंतरचा एक फोटो शेअर केला आहे आणि त्याच्यासोबत मजेशीर कॅप्शन दिले आहे.

तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘एलेक्सा, प्लीज हे गाणे वाजव – ओ हसीना जुल्फो वाली.’ हरलीनच्या या पोस्टला स्मृतीनेही तशाच मजेशीर पद्धतीचा रिप्लाय दिला आहे. स्मृतीने रिप्लायमध्ये लिहिले आहे की, ‘एलेक्सा, प्लीज हरलीनला म्यूट कर.’ चाहत्यांमध्ये ही पोस्ट व्हायरल होत आहे.

स्मृतीने या सामन्यात २१६ चेंडूत २२ चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने १२७ धावा केल्या आहेत. तसेच पूनम राऊतसोबत दुसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी केली होती आणि हा ऑस्ट्रेलियामध्ये विक्रम ठरला आहे. यापूर्वी स्मृतीने शेफाली वर्मासोबत पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियात १२७ धावा करणारी स्मृती पहिली महिला खेळाडू ठरली आहे. यापूर्वी इंग्लंडच्या माॅली हाइडने ऑस्ट्रेलियामध्ये १२४ धावा केल्या होत्या.

स्मृती ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये शतक करणारी दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. यापूर्वी १९८४ मध्ये संध्या अगरवालने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३४ धावांची खेळी केली होती आणि हे कसोटी क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियविरुद्ध महिला खेळाडूने केलेली पहिले शतक होते. स्मृतीने केलेल्या शतकाआधी ऑस्ट्रेलियमध्ये रजनी वेणुगोपाल यांनी १९९१ मध्ये सर्वाधिक ५८ धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

दिल्ली कॅपिटल्सच्या रंगीबेरंगी जर्सीची ‘ही’ आहे खासियत, कारण ऐकून प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुगेल!

कोहलीकडून धडे घेतल्यानंतर जयस्वाल होणार ‘यशस्वी’, मोठी खेळी करण्यासाठी मिळालाय ‘हा’ गुरूमंत्र

जेव्हा अश्विनला तसा जल्लोष केल्याने खावे लागले होते धोनीचे बोलणे, सेहवागने सांगितला जुना किस्सा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---