भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर (HarmanPreet Kaur) आणि सलामीवीर शफाली वर्मा (Shafali Verma) यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी20 मालिकेत शानदार कामगिरी केली. त्यानंतर आयसीसी टी20 क्रमवारीत दोघींनी अनुक्रमे 12व्या आणि 15व्या स्थानावर झेप घेतली आहे. हरमनप्रीतनं तीन स्थानांनी झेप घेतली. तिचे एकूण 613 रेटिंग गुण आहेत. तर शफालीला दोन स्थानांचा फायदा झाला आहे. तर न्यूझीलंडची अमेलिया केर आणि इंग्लंडची डॅनी व्याटसह ती 15व्या क्रमांकावर आहे.
भारतीय महिला संघाची सलामीवीर स्म्रीती मानधना (Smriti Mandhana) पाचव्या स्थानावर कायम असून ती भारतीय महिला खेळाडूंमध्ये अव्वल स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियन जोडी बेथ मुनी (Jodie Beth Mooney) आणि ताहलिया मॅकग्राथ (Tahlia McGrath) महिला टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.
महिला गोलंदाजांच्या टी20 रँकिंगमध्ये भारताची अनुभवी फिरकीपटू दीप्ती शर्मा (Deepti Sharma) तिसऱ्या स्थानावर कायम आहे. राधा यादव आठ स्थानांनी प्रगती करत 15व्या स्थानावर पोहोचली. पूजा वस्त्राकर सहा स्थानांनी 23व्या तर श्रेयंका पाटील नऊ स्थानांनी प्रगती करत 60व्या स्थानावर आली आहे.
इंग्लंडची फिरकीपटू सारा ग्लेनने (Sarah Glenn) 768 गुणांसह तिच्या कारकिर्दीतील नवीन सर्वोच्च रेटिंग मिळवली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सध्याच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील 4 सामन्यांत तिनं 8 विकेट्स तिच्या नावी केल्या. त्यामुळे ती दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. तर अनुभवी फिरकीपटू सोफी एक्लेस्टोन (Sophie Ecclestone) शीर्षस्थानी बनून आहे.
महिला टी20 अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत वेस्ट इंडिजची स्टार खेळाडू हेली मॅथ्यूज (Hayley Matthews) अव्वल स्थानावर आहे. तर ऍशले गार्डनर (ASHLEIGH GARDNER) दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर भारताची दीप्ती शर्मा (Deepti Sharma) तिसऱ्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठ्या मनाचा मोठा खेळाडू! सामनावीर पुरस्कार केला चाहत्याला भेट; VIDEO एकदा पाहाच
भारताच्या माजी क्रिकेटपटूचा गडबड घोटाळा! प्रशिक्षकाच्या मदतीनं केली वयात फसवणूक
पॅरिस ऑलिम्पिकचे लाईव्ह सामने भारतामध्ये कुठे आणि कधी पाहायचे? जाणून घ्या एका क्लिकवर