---Advertisement---

ब्रेकिंग! हरमनप्रीतच्या शिरपेचात मानाचा तुरा, मिळालं भारतीय महिला वनडे संघाचं कर्णधारपद

On: बुधवार, जून 8, 2022 6:16 PM
Harmanpreet-Kaur
---Advertisement---

क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. बुधवारी (दि. ०८ जून) भारतीय महिला वनडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी हरमनप्रीत कौर हिच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बुधवारीच भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राज हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर काही तासातच भारतीय महिला वनडे संघाला हरमनप्रीतच्या रुपात नवीन कर्णधार मिळाली आहे.

भारतीय निवड समितीने बुधवारी (दि. ०८ जून) श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केली. यामध्ये भारतीय संघाला ३ टी२० आणि ३ वनडे सामने खेळायचे आहेत. टी२० मालिकेला २३ जूनपासून सुरुवात होत आहे. या दोन्ही मालिका दांबुला आणि कँडी येथे पार पडणार आहेत.

निवड समितीने भारतीय संघाची घोषणा करताना भारताच्या वनडे क्रिकेट संघाचे कर्णधारपद हरमनप्रीत कौर हिच्याकडे सोपवले आहे. याव्यतिरिक्त स्म्रीती मंधाना हिला उपकर्णधार बनवले आहे. विशेष म्हणजे, हरमनप्रीतकडे टी२० संघाचे कर्णधारपद आधीपासूनच होते.

https://twitter.com/BCCIWomen/status/1534508515053957120

हरमनप्रीतची वनडे कारकीर्द
हरमनप्रीत कौर हिने आतापर्यंत भारतीय संघाकडून ११८ वनडे सामने खेळले आहेत. या सामन्यात तिने ३५.५०च्या सरासरीने २९८२ धावा चोपल्या आहेत. या धावा करताना तिने ४ शतके आणि १५ अर्धशतके झळकावली आहेत.

https://twitter.com/BCCIWomen/status/1534508424473755648

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ

वनडे- हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्म्रीती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), एस मेघना, दीप्ती शर्मा, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, सिमरन बहादूर, रिचा घोष (यष्टीरक्षक), पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग , तानिया भाटिया (यष्टीरक्षक), हरलीन देओल.

टी२०- हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्म्रीती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), एस मेघना, दीप्ती शर्मा, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, सिमरन बहादूर, ऋचा घोष (यष्टीरक्षक), पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग, जेमिमाह रोड्रिग्ज राधा यादव.

मितालीला आवडतात ‘हे’ पुरुष क्रिकेटपटू, सोशल मीडियावर केलं होतं जाहीर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---