मिताली राजच्या (Mithali Raj) नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाला न्यूझीलंड दौऱ्यात (India Women vs New Zealand Women) लागोपाठ तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. क्वीन्सटाउन येथे शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ३ विकेट्सने पराभव केला. भारतीय संघाकडून तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. परंतु एमी सथरवेट आणि लॉरेन डाऊन यांच्या खेळी भारतीय फलंदाजांच्या खेळीवर भारी पडल्या.
या विजयासह न्यूझीलंडचा संघ ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ३-० ने आघाडीवर आहे. यापूर्वी झालेल्या न्यूझीलंड आणि भारतीय संघातील एका टी२० सामन्यामध्येही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाज आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर धावबाद झाली. यावर चाहते खूपच निराश झाले आहेत, कारण ती खूप सहज धावबाद झाली आहे. हरमनप्रीतचा धावबाद झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
भारताच्या डावातील २८ व्या षटकात हा प्रसंग घडला. न्यूझीलंडची फिरकी गोलंदाज फ्रान्सिस मॅकवॉय ही हे षटक टाकत होती. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हरमनप्रीतने क्रीझच्या बाहेर येऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू बॅटला नीट न लागल्याने तो थेट गोलंदाज मॅकवॉयकडे गेला. न्यूझीलंडच्या या फिरकीपटूने लगेचच चेंडू केटी मार्टिनकडे टाकला आणि हरमनप्रीत परत येईपर्यंत केटीने तिला बाद केले.
https://www.instagram.com/reel/CaGQROQlfTF/?utm_source=ig_web_copy_link
हरमनप्रीत ज्या पद्धतीने बाद झाली, ते व्हिडीओत पाहून चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले आहे. एका चाहत्याने लिहिले आहे की, ‘हरमनप्रीतला संघातून वगळण्याची वेळ आली आहे.’ दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, ‘कदाचित ती झोपली होती.’ दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, ‘आम्ही टी२० नंतर एकदिवसीय मालिकाही गमावली. भारतीय संघ गल्लीतील क्रिकेटप्रमाणे खेळत आहे’. हरमनप्रीत गेल्या काही काळापासून खराब खेळी करत आहे. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्यच एकदिवसीयमध्ये ती धावबाद झाली होती.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्याअगोदरच भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडुल्जी यांनी हरमनप्रीत कौरच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि तिला संघातून वगळण्याची मागणी केली होती. हरमनप्रीतने इंग्लंडमध्ये २०१७ च्या विश्वचषकानंतर केवळ दोनदाच ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
दुसऱ्या टी२०त कायरन पोलार्डचे स्पेशल ‘शतक’, संघाने खास भेट देत बहुमूल्य क्षणाला बनवले अविस्मरणीय
पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचा युवराज सिंगला झटका, गुन्हा रद्द करण्याची मागणी फेटाळली